Satara Politics Latest News
सातारा : राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार म्हणजे शब्द पाळणारा नेता आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळल्याने मी खासदार झालो आहे, या खासदारकीने पुन्हा एकदा महाराष्ट्रात अजित पवार म्हणजे शब्द पाळणारा नेता हीच ओळख घट्ट झाली आहे, असे मत नवनिर्वाचीत खासदार नितीन पाटील यांनी व्यक्त केले. दुसरीकडे भाजपचे मदन भोसले हे शरद पवार गटात जाणार, अशी चर्चा सुरूये. या पार्श्वभूमीवर मकरंद पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीये. मदनदादा कुठेही गेले तरी फरक पडणार नाही, असं मकरंद पाटील यांनी म्हटलंय.
यावेळी आमदार मकरंद पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, माजी उपाध्यक्ष राजेंद्र यादव, विजय यादव, स्मिता हुलवान, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, राजेश पाटील-वाठारकर उपस्थित होते. खासदारकी मिळाल्यानंतर पाटील यांनी मंगळवारी येथे भेट दिली. त्यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंततराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. तत्पूर्ती त्यांचे दत्त चौकात शाहीर यादव प्रतिष्ठानतर्फे विजय व राजेद्र यादव यांनी स्वागत केले. भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष कदम, शहराध्यक्ष बागडी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी स्वागत केले.