कऱ्हाड (सातारा) : दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा आणि कोकणला (Konkan) जोडला जाणारा कऱ्हाड ते ढेबेवाडी ते संगमनगर धक्का मार्गाला राज्यमार्गाचा दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Minister Dattatray Bharane) यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात खासदार पाटील यांनी पत्र लिहिले आहे. कोकणच्या दिशेला जाण्यासाठी कऱ्हाड किंवा उंब्रज ते पाटण असे मार्ग आहेत. त्या मार्गावर काही अडथळा निर्माण झाल्यास अथवा अतिवृष्टीत मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यास वाहनधारकांसह प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागतो. त्यास समांतर पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांची मोठी अडचण होते. (MP Shrinivas Patil Demand To The Government To Make Karad-Sangamnagar State Highway bam92)
दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा आणि कोकणला जोडला जाणारा कऱ्हाड-ढेबेवाडी ते संगमनगर धक्का मार्गाला राज्यमार्गाचा दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.
कऱ्हाड ते ढेबेवाडी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ढेबेवाडीपर्यंत पूर्ण झाले आहे. परंतु, मार्गाची नोंद प्रमुख जिल्हा मार्ग अशी आहे. त्याला राज्य मार्गाचा दर्जा देऊन सुधारणा कराव्यात. पुणे ते बंगळूर महामार्गापासून (Pune to Bangalore Highway) सुरू झालेला कऱ्हाड ते ढेबेवाडी मार्ग ढेबेवाडीपासून पुढे सणबूर, महिंद, सळवे, पाळशी, लेंढोरी, कुसरुंड, नाटोशी, मोरगिरी ते संगमनगर धक्का असा राज्यमार्ग म्हणून प्रस्तावित करावा. तो मार्ग झाल्याने कऱ्हाडपासून ढेबेवाडीपर्यंतचा भाग कोयना विभागाला जोडला जाईल. पर्यटनाची वाढ मोठ्या प्रमाणात होईल. ढेबेवाडी विभागाला कोकणात जाण्यासाठी जवळचा व जलद मार्ग निर्माण होईल. अतिवृष्टीमध्ये कऱ्हाड ते चिपळूण हा मार्ग काही वेळा बंद होतो. त्या काळात मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून उपयोग करता येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुनगीलवार व अन्य अधिकाऱ्यांची सातारा येथे बैठक घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे सादर करण्याच्या सूचना खासदार पाटील यांनी यापूर्वी केल्या आहेत.
राज्यमार्गासाठी अनेक ग्रामपंचायतींचे ठराव
काढणे, ताईगडेवाडी, मानेगाव, करपेवाडी, कुंभारगाव, पाचुपतेवाडी, कुठरे, मोरेवाडी, सणबूर, सळवे, महिंद, ढेबेवाडी, बनपुरी जानुगडेवाडी, मान्याचीवाडी, मालदन, गुढे, भोसगाव, रुवले, कारळे, तामिणे, पाळशी, अंबवडे, पाणेरी, रुवले, उधवणे, मराठवाडी आदी गावांतील ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे तशी मागणी केली आहे.
MP Shrinivas Patil Demand To The Government To Make Karad-Sangamnagar State Highway bam92
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.