विंग (सातारा) : साहेब, डोळ्यादेखत बागा भुईसपाट झाल्या..., तोडणीस आलेलं केळीच घडही (Rain Damaged Banana Orchard) उद्ध्वस्त झालं..., आता आम्ही काय करायचं...., कसं यातून सावरायचं.., अशी आर्त साद चचेगाव (ता. कऱ्हाड) येथील शेतकऱ्यांनी आज खासदार श्रीनिवास पाटील (MP Shrinivas Patil) यांना घातली. खासदार पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जावून चक्रीवादळा पडलेल्या केळी बागांची पाहणी केली. त्यावेळी शेतकरी नुकसानीची माहिती देत होते. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसताना नुकसानीचे पंचनामे करून त्वरित भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. (MP Shrinivas Patil Inspected The Rain Damaged Banana Orchard Satara Marathi News)
चक्रीवादळात (Cyclone Tauktae) शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. तुफान वाऱ्याच्या गतीमुळे चचेगाव परिसराला त्याचा सर्वाधिक फटका बसलाय. तेथील विलास पवार, साहेबराव पवार, हनुमंत हुलवान, संदीप पवार, रेखा हुलवान आदी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बागा मोडून पडल्या आहेत. सात एकरावरील हातातोंडाला आलेला घास वादळाने हिरावून नेला. केळी तोडून विक्रीस नेणार तत्पूर्वीच वादळी वाऱ्याने बागा अक्षरश: भुईसपाट केल्या. त्यात २० लाखांचे नुकसान झाले. दरम्यान, ही उद्ध्वस्त शेती पाहून शेतकरी यावेळी खासदारांसमोर ओक्साबोक्सी रडत होते. साहेब, या संकटातून आम्हाला वाचवा, अशी साद घालत होते. कोरोना संकटाला तोंड देतादेता नाकीनऊ आले असताना, हे पावसाचे संकट शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करणारे ठरत आहे.
खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज चचेगाव येथे भेट दिली. नुकसान झालेल्या केळी बागांची फिरून पाहणी केली. यावेळी संबंधित शेतकऱ्यांना पाटील यांनी धीर दिला व भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तद्नंतर कृषी विभागाला पंचनाम्याबाबत आवश्यक सूचना दिल्या. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इतर काही योजनेतून मदत मिळवून देता येते का. त्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार पाटील यांनी दिली. तहसीलदार अमरदीप वाकडे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलतराव चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, कृषी सहाय्यक बाळासाहेब माळी, तलाठी एम.एस. राऊत, पोलीस पाटील प्रशांत पाटील यासह कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
MP Shrinivas Patil Inspected The Rain Damaged Banana Orchard Satara Marathi News
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.