पूरग्रस्त भागात केंद्राच्या निधीतून कामे करा

Shriniwas Patil-Nitin Gadkari
Shriniwas Patil-Nitin Gadkariesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : अतिवृष्टीमुळे (Heavy Rain In Satara) झालेल्या नुकसान भरपाईसाठी निधी द्यावा. जिल्ह्यातील पूरग्रस्त (Satara Flood), भूस्खलन (Patan Taluka Landslide) भागातील रस्ते व पूलांची कामे तात्काळ होणे आवश्यक असल्याने ती कामे केंद्रीय रस्ते निधीमधून (Central Roads Fund) करावीत, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील (MP Shriniwas Patil) यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांच्याकडे केली आहे. नुकसाग्रस्त भागात रस्ते व पूल तुटल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कामे त्वरित होण्याचीही मागणी खासदार पाटील यांनी केली आहे. (MP Shriniwas Patil Demand To Minister Nitin Gadkari To Provide Central Road Fund To Flood Areas bam92)

Summary

लोकसभेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत असलेले खासदार पाटील मुसळधार पावसातही जिल्ह्यात आले. दोन दिवस महाबळेश्वर, वाई, सातारा, जावळी, पाटण व कऱ्हाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा प्रत्यक्ष दौरा केला.

लोकसभेच्या अधिवेशनासाठी (Lok Sabha session) दिल्लीत असलेले खासदार पाटील मुसळधार पावसातही जिल्ह्यात आले. दोन दिवस महाबळेश्वर, वाई, सातारा, जावळी, पाटण व कऱ्हाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचा प्रत्यक्ष दौरा केला. त्यानंतर काल (सोमवारी) ते पुन्हा अधिवेशनासाठी दिल्लीला गेले. दिल्लीत पोचताच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांची त्यांनी भेट घेतली. भेटीत नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती त्यांना खासदार पाटील यांनी दिली. यावेळी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांसह, रस्ते, पूल व नाल्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Shriniwas Patil-Nitin Gadkari
'त्या हिंसाचारात पुण्याचे निंबाळकर जखमी

त्याला मदत होणे अपेक्षित आहे, असे स्पष्ट करून खासदार पाटील म्हणाले, जिल्ह्यातील रस्ते व पूल तुटल्याने नागरिकांचे हाल होत असून त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रस्ते व पूलांची कामे तातडीने होणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक पूल हे जुन्या पद्धतीचे, कमी उंचीचे असल्याने अतिवृष्टीच्या परिस्थितीत धोकादायक बनत असतात. पावसाळ्यात या मार्गावरील दळणवळण ठप्प झाल्याने नागरिकांचा सतत संपर्क तुटत असतो. त्यामुळे अनेक ठिकाणी पुलांची पुनर्बांधणी व काही ठिकाणी नवे पूल होणे गरजेचे आहे. त्यातील काही पूल हे तातडीने केंद्रीय रस्ते निधीमधून करावेत. त्यामुळे विस्कळीत झालेली दळणवळण सुविधा पुन्हा सुरळीत होईल. भविष्यात अशा अतिवृष्टीत सुद्धा वाहतूक व्यवस्था कोलमडणार नाही.

MP Shriniwas Patil Demand To Minister Nitin Gadkari To Provide Central Road Fund To Flood Areas bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.