'...म्हणून पुण्याचे पालकमंत्री आल्यावर शरद पवार उठून उभे राहिले'; अजितदादांवर निशाणा साधत काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे ६० वर्षे राजकारणात आहेत. त्यांनी चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात ते मंत्री होते.
MP Supriya Sule vs Ajit Pawar
MP Supriya Sule vs Ajit Pawaresakal
Updated on
Summary

''ही पालकमंत्र्यांची दडपशाहीच आहे. त्या दडपशाहीविरोधात मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आमदार, खासदारांचे काय नियम, कायदे आहे हे विचारणार आहे.''

कऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे ६० वर्षे राजकारणात आहेत. त्यांनी चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात ते मंत्री होते. काल मी आणि पवार साहेब जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गेलो. नेहमीप्रमाणे बैठकीसाठी वेळेअगोदर पवार साहेब व मी येवून बसलो होतो. पालकमंत्री बैठकीसाठी आल्यानंतर ज्येष्ठ नेते पवार हे पालकमंत्र्यांचा प्रोटोकॉल म्हणून स्वतः उठून उभे राहिले. त्यांनी पालकमंत्र्यांचा प्रोटोकॉल पाळला. मात्र, पालकमंत्र्यांनी तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार नाही, असे सांगितल्यावर त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही, अशी स्पष्टोक्ती खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली.

आमदार बाळासाहेब पाटील (MLA Balasaheb Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महिला मेळाव्यासाठी खासदार सुळे रविवारी कऱ्हाड (जि. सातारा) दौऱ्यावर होत्या. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, महिला विभागाच्या संगिता साळुंखे, प्रभाकर देशमुख, देवराज पाटील व मान्यवर उपस्थित होते.

MP Supriya Sule vs Ajit Pawar
उद्या गडावर जाऊन, कोणीही फाईव्हस्टार हॉटेल बांधेल; विशाळगडावरुन उदयनराजेंचा अतिक्रमणधारकांना स्पष्ट इशारा

खासदार सुळे म्हणाल्या, खासदार शरद पवार यांनी नियोजन समितीच्या बैठकीत तालुकानिहाय विकासकामांचा आढावा देण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती सध्या नाही ती घेवून देतो असे सांगितले. त्यामुळे त्यावर तो विषय संपला होता. मात्र, पुण्याच्या पालकमंत्र्यांनी आम्हाला अद्यादेश दाखवून त्यात आमदार, खासदार हे आमंत्रित असून त्यांना प्रश्न विचारायचा अधिकारी नाही, असे सांगितले. तुम्हाला आम्ही पुढे बसवतो. मात्र, मागचे पुढे बसायला पाहिजेत, असे ते म्हणाले.

तसा प्रोटोकॉल असेल तो अनेक वर्षे का पाळला गेला नाही? आम्ही मागेच काय कुठेही बसलो असतो. अद्यादेशात बैठकीला आमंत्रित असलो तर संविधानाप्रमाणे प्रत्येकाला बोलायचा अधिकारी आहे, त्या बैठकीला आम्ही मतदान करु शकत नाही. आम्ही मतदान मागत नव्हतो, तर प्रश्न विचारत होतो. ज्येष्ठ नेते पवार यांनी विकास निधी कसा वाटला जातो असे विचारले. त्यावर पालकमंत्र्यांनी मोठे व्याख्यान दिले. त्यानंतर मी तो अद्यादेश रात्री वाचून आम्हाला बोलायचा अधिकारी नाही तर बैठकीला बोलवता कशाला असे प्रशासनाला विचारले. त्यावर प्रशासनाने आम्हाला बोलायचा अधिकार आहे, असे सांगितले.

MP Supriya Sule vs Ajit Pawar
Vishalgad Riots : गजापूर दंगलीप्रकरणी संभाजीराजेंसह हल्लेखोरांवर कडक कारवाई करा; कोल्हापुरात MIM ची निदर्शने

मग, ही पालकमंत्र्यांची दडपशाहीच आहे. त्या दडपशाहीविरोधात मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आमदार, खासदारांचे काय नियम, कायदे आहे हे विचारणार आहे. पालकमंत्र्यांनी ज्यावेळी तुम्हाला बोलण्याचा अधिकारी नाही असे सांगितल्यावर पवार साहेबांनी एकही प्रश्न विचारला नाही. बैठकीसाठी काल वेळेअगोदर ते येवून बसले होतो. पालकमंत्री बैठकीसाठी आल्यानंतर ज्येष्ठ नेते पवार हे पालकमंत्र्यांच्या प्रोटोकॉल म्हणून स्वतः उठून उभे राहिले. मी मात्र प्रश्न विचारले, मी नाही थांबले. एवढ्या नियम कायद्याने सरकार चालत असेल सगळ्याच बाबतीत नियम कायदे करावे. व्यासपीठावर जो कोणी बसेल त्याचा प्रत्येकाचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे. ही दडपशाहीची सुरुवात आहे. त्याविरोधात आम्ही नेहमीच लढू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

MP Supriya Sule vs Ajit Pawar
Supriya Sule : महाविकास आघाडीतील कोणता पक्षाला किती जागा मिळणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं...

''पुणे क्राईमची राजधानी बनलीये''

महाराष्ट्रात सध्या क्राईम वाढले आहे असे सांगून सुळे म्हणाल्या, जेव्हा-जेव्हा भाजप सरकार सत्तेवर येते त्यावेळी क्राईम वाढते हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो. पहिल्या पाच वर्षांपूर्वी नागपूरला क्राईम जास्त असायचा. आज ते बदलले असून पुणे हे आज राज्याचे क्राईम कॅपिटल झाले आहे. हे सांगताना मला वेदना होत आहेत. मला महाराष्ट्र पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. देशात चांगले पोलिस महाराष्ट्रात आहेत. मात्र मंत्री, सरकार सिरियस नसल्याने अशा गोष्टी होत आहेत.

अनेक समाज आंदोलन करतात, त्यावेळी लाठीहल्ला केला जातो ते आदेश कोणी दिले याचे आजही महाराष्ट्र सरकारकडे उत्तर मागतोय. जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणे, भडखाऊ भाषणे करणे, दोन समाजात अंतर वाढेल अशी भाषणे सरकारकडूनच येत आहेत. घरफोडा, पक्षफोडा, चिन्ह काढून घ्या हेच काम सध्या सुरु आहे. सरकारने सामान्यांसाठी काहीच केले नाही. या सरकारमधील भ्रष्टाचारावर तर काय बोलणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.