Satara : पैसा कोणी खाऊ शकतं का? देवानं तोंड, जीभ दिली म्हणून..; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर घणाघात

आम्ही पैसा खाल्ला असता तर सातारा शहरात विकासकामांचे प्रकल्प झाले असते का?
Udayanaraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Udayanaraje Bhosale vs Shivendraraje Bhosaleesakal
Updated on
Summary

देवाने तोंड दिले, जीभ दिली म्हणून त्यांनी अजून बोलावे, खुशाल बोलावे, असा सल्ला त्यांनी दिला.

सातारा : आम्ही पैसा खाल्ला असता तर सातारा शहरात विकासकामांचे प्रकल्प झाले असते का, त्यांच्या काळात त्यांनी पैसे खाल्ले नाहीत, त्यामुळे प्रकल्प झाले नाहीत. विचार करा पैसे कोण खाऊ शकतो का, असा प्रश्न उपस्थित करून प्रत्येकाने बोलताना विचार करून बोलावे, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजेंसह त्यांच्या नगरविकास आघाडीला दिला.

शिवेंद्रसिंहराजेंनी (Shivendraraje Bhosale) पत्रकारांशी बोलताना खासदार उदयनराजेंच्या (Udayanraje Bhosale) सातारा विकास आघाडीवर (Satara Vikas Aghadi) टीकेची झोड उठवली होती. त्याला खासदार उदयनराजेंनी प्रतिउत्तर दिले.

Udayanaraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Congress : भारत जोडो यात्रेत चालताना खूप त्रास झाला, पण..; राहुल गांधींनी शेअर केला अनुभव

उदयनराजे म्हणाले, ‘‘आम्ही पैसा खाल्ला. मग कोण नाही म्हणतंय, अगदी चढाओढ चालली होती. कारण पैसा खाल्ला असता तर विकासकामांचे प्रकल्प झाले असते का. त्यांच्या नगरविकास आघाडीच्या सत्ता काळातील २५ ते ३० वर्षे त्यांनी पैसा खाल्ला नाही. त्यामुळे सातारा शहरात प्रकल्प झाले नाहीत. त्यामुळे तुम्ही विचार करा पैसा कोणी खाल्ला आणि कोणी नाही.’’

Udayanaraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
CBI Office : खासदार संजय सिंहांसह 'आप'च्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; CBI कार्यालयाबाहेर मोठी गर्दी

पैसा कोणी खाऊ शकत का, असा प्रश्न करून उदयनराजे म्हणाले, ‘‘पैसे खाल्ले असते तर विकासकामे झाली असती का. त्यांच्या काळात कामे झाली नाहीत, असे आम्ही म्हणायचे का. त्यामुळे बोलताना प्रत्येकाने विचार करून बोलावे. देवाने तोंड दिले, जीभ दिली म्हणून त्यांनी अजून बोलावे, खुशाल बोलावे, असा सल्ला त्यांनी दिला.’’

Udayanaraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Politics News : सोनिया गांधी राजकारणातून संन्यास घेणार? काँग्रेस प्रवक्त्या म्हणाल्या, मला आनंद होत आहे की..

बैठकीतून काय निष्पन्न होणार

सातारा शहरातील वाहतूक कोंडी व पार्किंग समस्येबाबत आज पालिकेत वाहतूक सल्लागार समितीची बैठक शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रमुख उपस्थितीत झाली. याविषयी उदयनराजे म्हणाले, की मुळात वाहतूक समस्येबाबतची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत होण्यास हवी होती. त्यामुळे अशा बैठकीतून काय निष्पन्न होणार, असा टोला त्यांनी लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()