अलीकडच्या काही दिवसांत अजित पवारांचे जिल्ह्यातील दौरे वाढले आहेत.
सातारा : प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढवण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. त्यासाठी ते विधाने करत असतात. त्यात गैर काय? असा प्रश्न खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीच काय उद्या कम्युनिस्ट पक्ष, भाजपच्या (BJP) लोकांनाही आपला खासदार सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडून यावा, असे वाटते. ही चांगली गोष्ट आहे; पण यातून कोणी आव्हान दिले तर मी त्यांच्या आव्हानांना भीक घालत नाही. आव्हान कोणाचे स्वीकारायचे हे मी ठरवतो, असा टोला उदयनराजेंनी अजितदादांना (Ajit Pawar) लगावला.
विरोधी पक्षनेते अजित पवार काल जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी पुढचा साताऱ्याचा खासदार व सातारा- जावळीचा आमदारही राष्ट्रवादीचाच असेल, असे वक्तव्य केले होते. याबाबत खासदार उदयनराजेंना विचारले असता ते म्हणाले, 'प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते. समाजकारण, राजकारणात आपण जर व्यापकपणे विचार केला नाही, तर पुढेच जाऊ शकत नाही. ही तर लोकशाही आहे. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. ते काय बोलले असतील, निश्चित चांगले विचार लोकांना दिले असतील.'
'प्रत्येक नेत्याची पक्ष वाढविण्याची जबाबदारी असते. त्यातून त्यांनी अशी विधाने केली असतील. त्यात काय गैर नाही. त्यांच्या म्हणण्याचे स्वागत आहे. खासदारकीबाबत बोलायचे झाले, तर उद्या कम्युनिस्ट पक्षाचे लोक म्हणतील, आमचा खासदार निवडून यावा. तसेच भारतीय जनता पक्षाच्या लोकांनाही आपला खासदार यावा असे वाटते.'
अशा पद्धतीने विचार मांडून तुम्हाला आव्हान दिल्यासारखेच आहे, असे वाटत नाही का? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ‘‘मी आव्हानांना भीक घालत नाही. आव्हान कोणाची स्वीकारायची हे मी ठरवतो. आव्हानासारखा लांबलचक, बुद्धिभेद करणारे शब्द वापरू नका. अलीकडच्या काही दिवसांत अजित पवारांचे जिल्ह्यातील दौरे वाढले आहेत. त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होईल, असे वाटते का, त्याविषयी विचारले असता उदयनराजे म्हणाले, ‘‘कदाचित त्यांना येथूनच निवडणूक लढवावी वाटत असेल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.