Udayanraje Bhosale : श्रेय उदयनराजेंना जातं हे सांगताना त्यांना घशाशी येतं; खासदार शिवेंद्रराजेंवर भडकले

'आमचे प्रस्ताव म्हणजे फोटोसेशन अशी ओरड करणाऱ्यांना आता कोरड पडेल.'
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosaleesakal
Updated on
Summary

'आमचे प्रस्ताव म्हणजे फोटोसेशन अशी ओरड करणाऱ्यांना आता कोरड पडेल.'

सातारा : कास धरण (Kas Dam) ते सातारा शहर या सुमारे २७ किलोमीटर लांबीच्या अतिरिक्त नवीन पाइपलाइनच्या ८७.२१ कोटींच्या प्रस्तावाला केंद्राच्या अमृत योजनेतून प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. कासची उंची वाढवण्याचा प्रस्ताव सर्व प्रथम आम्हीच दिला होता. याचे श्रेय उदयनराजेंना जाते हे सांगताना ज्यांना घशाशी येते आणि ज्यांना आमचे प्रस्ताव म्हणजे फोटोसेशन वाटते. त्यांना बसलेली ही मोठी चपराक आहे, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शिवेंद्रसिंहराजेंवर (Shivendrasinghraje Bhosale) निशाणा साधला.

उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या सूचनेवरून या नवीन पाइपलाइनच्या कामाच्या प्रस्ताव केंद्राकडे सादर केला होता. या प्रस्तावाला केंद्राने प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले, की कास धरणाची उंची वाढविल्यास, गुरुत्वाकर्षण पद्धतीने बिनखर्चाचे मुबलक पाणी सातारा शहराला मिळेल. यासाठी सर्वप्रथम कास धरणाची उंची वाढवण्याचे काम प्रस्तावित केले. त्यानुसार या कामास वन विभाग, पर्यावरण विभाग, ग्रीन ट्रॅब्युनल अशा विविध विभागांच्या, तसेच युनेस्कोच्या मंजुरी मिळवण्यात आली. त्यानंतर कामास सुरुवात झाली. हे काम पूर्ण झाले आहे.

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
VIDEO : अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपती क्रिस्टीना फर्नांडिसांच्या हत्येचा प्रयत्न; बंदूकधारी व्यक्तीला अटक

पूर्वीपेक्षा कास धरणाची पाण्याची साठवण क्षमता ०.५ टीएमसीने वाढली आहे. त्यामुळे चौपट पाणीसाठा वाढला आहे. सातारा शहराला मुबलक म्हणजे सुमारे ३५ एमएलडी पाणी दररोज उपलब्ध होण्याकरिता सध्याची पाइपलाइन शिवाय नवीन ८७.२१ कोटींचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये ९०० एमएम व्यासाची अतिरिक्त पाइपलाइन, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आदी कामांचा समावेश आहे. आम्ही स्वत: या खात्याचे मंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेऊन प्रस्ताव त्वरित मंजूर करून घेतला आहे. नगरविकास मंत्रालयाने ८७.२१ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. अतिरिक्त‍ पाइपलाइनचे काम करताना कासचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही; पण आमचे प्रस्ताव म्हणजे फोटोसेशन अशी ओरड करणाऱ्यांना आता कोरड पडेल, अशी टीका करून आमच्या या रिझल्ट ओरिएंटेड कामांचा धसका संबंधितांना नक्कीच बसेल, असेही उदयनराजे भोसले यांनी नमूद केले आहे.

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
INS Vikrant : 'विक्रांत' केवळ युद्धनौका नाहीय, भारताच्या कठोर परिश्रमाचा हा पुरावा आहे : नरेंद्र मोदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.