सातारा : आपला देश प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही, प्रत्येक व्यक्तीनं पर्यावरण विषयक सजग राहिल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू शकू, असं मत खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी जागतिक पर्यावरण दिनी व्यक्त केलंय. दरवर्षी 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ (World Environment Day) म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे, हा यामागचा मुख्य उद्देश. (MP Udayanraje Bhosale Has Expressed His Views On The Occasion Of World Environment Day)
आपला भारत देश विविध क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. मात्र, असे असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही.
आपला भारत देश विविध क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. मात्र, असे असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही. निसर्गावर अन्याय करतो, हे आपण त्सुनामी, नरगिससारखी सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवलं आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीनं पर्यावरणाचा समतोल राखल्यास आपण खर्या अर्थानं समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आज जगभरात मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे, त्यामुळे सजीवसृष्टी धोक्यात आली आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीनं पर्यावरणाची विशेष काळजी घेतल्यास, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास नक्कीच थांबेल. तसेच आपल्या परिसरात झाडे देखील लावणे गरजेचे आहे, जेणे करुन आपल्याला चांगला ऑक्सिजन मिळेल.
MP Udayanraje Bhosale Has Expressed His Views On The Occasion Of World Environment Day
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.