शेतकऱ्यांसाठी उदयनराजे समर्थकांचा 'या' गाेष्टीला विरोध

शेतकऱ्यांसाठी उदयनराजे समर्थकांचा 'या' गाेष्टीला विरोध
Updated on

सातारा : देगाव येथील औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक तीनच्या भूसंपादनास ग्रामस्थांचा विरोध असून, शासनाने या जमिनीवर 2008 मध्ये पडलेले औद्योगिक वसाहतीचे शिक्के काढून टाकावेत. तेथील शेतीसाठी शाश्‍वत पाण्याची सोय करावी, अशी मागणी देगावच्या ग्रामस्थांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
या कामाचे श्रेय फक्त आणि फक्त उदयनराजेंच; काेणी उठविला आवाज वाचा सविस्तर  

देगावच्या ग्रामस्थांनी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, पंचायत समिती सदस्य रामदास साळुंखे, सुनील काटकर, प्रवीण धस्के यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व मागणीचे निवेदन दिले. यावेळी विश्‍वास साळुंखे, तानाजी ढवळे, विकास पवार, सचिन साळुंखे, चिकू साळुंखे, संजय पवार, प्रकाश फडतरे, बबनराव घाडगे, हणमंत पवार, हंबीरराव साळुंखे, विनायक साळुंखे, तोडकर, घाडगे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

अकरावी प्रवेशासाठी मराठा जात प्रमाणपत्र असे काढा

या संदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, सध्या देगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक तीनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होत आहे. मुळात येथील ग्रामस्थांचा भूसंपादनास विरोध आहे. 2008 मध्ये येथील जमिनींवर औद्योगिक वसाहतीचे शिक्के पडले आहेत. यासंदर्भात वेळोवेळी 2008 पासून ग्रामस्थांनी विरोध केला आहे. तसेच उच्च न्यायालयातही दाद मागितली आहे. उच्च न्यायालयानेही शेतकऱ्यांच्या बाजूने 2014 मध्ये निकाल दिला आहे. त्यामुळे येथील जमिनीवरील औद्योगिक वसाहतीचे शिक्के काढून मिळावेत. तसेच शेतकऱ्यांना न्याय देऊन त्यांच्या शेतीसाठी शाश्‍वत पाण्याची सोय करावी. त्यामुळे येथील शेती 100 टक्के ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

संपादन - सिद्धार्थ लाटकर

घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी वाचा; अन्यथा तुमच्यावरही हाेऊ शकते कारवाई

साताऱ्यात या गाेष्टींसाठी बंदी; काळजी घ्या,सतर्क रहा 

Video पहा : उदयनराजे शिवेंद्रसिंहराजे भेटले अन् माध्यमांनी उदयनराजेंना छेडले; काय म्हणाले उदयनराजे वाचा 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.