आम्हीच काय, मुश्रीफांना कोणीही भेटू शकतो

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Updated on

सातारा : सध्या खासदार उदयनराजे जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. कालच त्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांची भेट घेतली व आज त्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांची अचानक भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजेंचा (MP Udayanraje Bhosale) महाविकास आघाडीतील नेत्यांशी संपर्क वाढत असल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे. मात्र, या चर्चांना उदयनराजेंनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. (MP Udayanraje Bhosale Met On Minister Hasan Mushrif Satara Marathi News)

Summary

सध्या खासदार उदयनराजे जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे.

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ हे कोल्हापूरचे आहेत. त्यांच्या कामाची एक वेगळीच शैली असून त्यांना आम्हीच काय कोणीही कधीही भेटू शकतो आणि त्यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधामुळेच त्यांना भेटलो असल्याचे खासदार उदयनराजेंनी या भेटीदरम्यान स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, सातारा नगरपरिषदेची (Satara Municipal Council) सुमारे ७ महिन्यांपूर्वी हद्दवाढ झाली. हद्दवाढ होण्यापूर्वीच्या हद्दीबाहेरील ग्रामीण नागरी क्षेत्राकरिता लोकसंख्येनुसार १५ या वित्त आयोगाची रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेली आहे. सदरची सुमारे २ कोटी ९२ लाख ६७ हजार १७० रुपयांची रक्कम हद्दवाढ झाली असल्याकारणाने, त्या भागाच्या विकासाकरिता सातारा नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात यावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी एका निवेदनाव्दारे समक्ष भेटून केली.

Udayanraje Bhosale
आरटीईअंतर्गत प्रलंबित शुल्क खासगी शाळांना त्वरित द्या

उदयनराजे म्हणाले, सन २०२०-२१ करिता शासन निर्णयानुसार बंधित निधीच्या पहिला हप्त्याच्या वितरणापोटी ग्रामपंचायत (Gram Panchayat), पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर अनुक्रमे १०:१०:८० टक्के या प्रमाणात निधी वितरीत करण्यात आलेला आहे. दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजी सातारा नगरपरिषदेची हद्दवाढ करण्यात आलेली आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या भागाचा १५ व्या वित्त आयोगाचा निधी सक्षम प्राधिकरण म्हणून सातारा नगरपरिषदेकडे वाढीव भागाच्या विकासाकरिता वर्ग करणे आवश्यक आहे. सध्या परिषदेकडे सदरचा निधी अखर्चित आहे. सदरचा निधी नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबत परिषदेकडे सूचना केली असता, आपल्या खात्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. तरी, सदरचा निधी सातारा नगरपरिषदेकडे वर्ग करण्याबाबत आपण जिल्हा परिषदेस योग्य त्या सूचना निर्गमित कराव्यात, अशी शिफारस त्यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे केली आहे.

MP Udayanraje Bhosale Met On Minister Hasan Mushrif Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.