रेल्वेमंत्र्यांसमोरच उदयनराजेंनी वाचला समस्‍यांचा पाढा; अश्विनी वैष्णव कोणता निर्णय घेणार? दोघांत महत्त्वपूर्ण चर्चा

लोणंद हे भविष्यात जंक्शन होण्याची गरज आहे. या स्थानकाचा फायदा साताऱ्यासह पुणे, सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांनाही होतो.
MP Udayanraje Bhosale met Railway Minister Ashwini Vaishnav
MP Udayanraje Bhosale met Railway Minister Ashwini Vaishnavesakal
Updated on
Summary

कऱ्हाड-चिपळूण रेल्वेमार्गाद्वारे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जनतेसाठी हा प्रकल्प हाती घेण्याची विनंती उदयनराजे यांनी वैष्णव यांना केली.

सातारा : जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी रेल्वे आणि दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली. रेल्वेमार्ग दुपदरीकरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा विषय प्रामुख्याने चर्चिला गेला आणि त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तातडीने पाहणी करण्याच्या सूचना श्री. वैष्णव यांनी दिल्या.

रेल्वे मार्ग दुपदरीकरणामुळे पार्ले (ता. कऱ्हाड) हद्दीतील शेतीकडे आणि लोकवस्त्यांकडे जाणारे मार्ग बंद झाले आहेत, त्यामुळे प्रचंड गैरसोय होत असल्याबाबत सरपंच आणि ग्रामस्थांनी खासदार उदयनराजेंची भेट घेतली होती. ही समस्या अग्रक्रमाने सोडविण्याची विनंती उदयनराजेंनी श्री. वैष्णव यांना केली.

MP Udayanraje Bhosale met Railway Minister Ashwini Vaishnav
'मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं असेल, तर उदयनराजेंनाच साताऱ्यातून उमेदवारी द्या'; कोणी केलीये मागणी?

या ठिकाणी अंडरपास काढून रस्ते तयार केल्यास केवळ पार्लेच नव्हे तर वडोली निळेश्वर, रिसवड आणि लगतच्या अनेक गावांना लाभ होणार आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत तातडीने तांत्रिक पाहणी करण्याच्या सूचना श्री. वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

लोणंद हे भविष्यात जंक्शन होण्याची गरज आहे. या स्थानकाचा फायदा साताऱ्यासह पुणे, सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांनाही होतो. दर्शन एक्स्प्रेस, कोल्हापूर- अहमदाबाद एक्स्प्रेस, पूर्णा एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस आणि दादर-हुबळी एक्स्प्रेस या प्रमुख गाड्यांना लोणंदला थांबा द्यावा. फलाट क्रमांक एकची लांबी वाढवून सुशोभीकरण करावे, या मागण्या लोणंद प्रवासी संघटनेने उदयनराजेंकडे केल्या होत्या. याविषयीही मंत्री वैष्णव यांनी कार्यवाहीच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

MP Udayanraje Bhosale met Railway Minister Ashwini Vaishnav
घरी निघालेल्या पालकमंत्र्यांच्या गाडीवर भिरकावली बाटली; पोवई नाक्यावर 100 पोलिस झाले गोळा, काय होतं बाटलीत?

उदयनराजेंच्‍या ‘अजिंक्यतारा एक्स्प्रेस’सह अन्‍य मागण्‍या

  • सातारा सैनिकांचा जिल्हा असल्याने जवानांच्‍या सोयीसाठी यशवंतपूर संपर्क क्रांती एक्स्प्रेस आणि कर्नाटक क्रांती एक्स्प्रेस या गाड्यांना साताऱ्यात थांबा द्यावा.

  • सह्याद्री एक्स्प्रेसऐवजी सुरू केलेली नवी गाडी मुंबईपर्यंत चालवावी.

  • कामानिमित्त पुण्यास ये- जा करणाऱ्यांच्या सोयीसाठी पुणे-बेळगाव इंटरसिटी गाडी सुरू करावी.

  • मुंबई ते पंढरपूर गाडी सातारा, कऱ्हाड, सांगली, मिरजमार्गे सुरू करून तिला ‘अजिंक्यतारा एक्स्प्रेस’ नाव द्यावे.

  • झेलम, दुरांतोसारख्या गाड्या पुण्याऐवजी मिरज, कोल्हापूरपर्यंत सुरू कराव्यात.

  • साताऱ्यात पिट लाइन, गाड्यांच्या देखभालीची तसेच रेल्वेत पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध करावी.

कऱ्हाड-चिपळूणचा डीपीआर तयार...

कऱ्हाड- चिपळूण रेल्वेमार्गाद्वारे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जनतेसाठी हा प्रकल्प हाती घेण्याची विनंती उदयनराजे यांनी श्री. वैष्णव यांना केली. या रेल्वेमार्गाचा नवा डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेतले असून लवकरच ते पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले. सातारा पोस्ट कार्यालयाच्या डागडुजी, दुरुस्तीसाठी केलेल्या निधीच्या मागणीस मंजुरी दिल्याबद्दल उदयनराजे यांनी श्री. वैष्णव यांचे आभार मानले, तसेच या कामांसाठी जास्तीतजास्त निधी देण्याची मागणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()