'तसं झालं तर माझी निवडणुकीतून सपशेल माघार असेल'

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Updated on
Summary

शेतकऱ्यांसाठी बेंबीच्या देटापासून बोलतात, की समोरच्याला वाटते की यांची खरोखरच तळमळ आहे.

सातारा : जरंडेश्वर कारखान्याला (Jarandeshwar Sugar Factory) कर्ज पुरवठा केल्याबद्दल सातारा जिल्हा बँकेला (Satara District Bank) ईडीची (ED) नोटीस आली होती. आता यातून सक्तवसुली संचालनालय या कर्जाची संचालकांकडून वसुली करणार आहे. जे संचालक याला जबाबदार आहेत, त्यांच्याकडूनच वसुली व्हावी, असे स्पष्ट करून हे निवडून बँकेवर जातात आणि आम्ही गेलो की जागा अडवली काय. मी जाग अडवली असेल, तर मग सगळ्यांनाच बाहेर काढा. ज्यांनी-ज्यांनी सहकारी संस्था मोडीत काढल्या त्यांनी दहा तारखेच्या आत जिल्हा बँकेतून अर्ज मागे घ्यावेत. तसे झाले तर माझी सपशेल माघार असेल, असे आव्हान खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी जिल्हा बँकेच्या राष्ट्रवादीचे संचालक व अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजेंना (MLA Shivendrasinharaje Bhosale) दिले.

जिल्हा बँकेत आज खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी ईडीच्या चौकशी व जरंडेश्वरला कर्ज पुरवठा केलेल्याची वसुली संचालकांकडून होणार असल्याबद्दल त्यांनी राष्ट्रवादीच्या विद्यमान संचालकांवर टीकेची झोड उठवली. उदयनराजे म्हणाले, आजपर्यंत मी तत्वे जपली अहेत. जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मी अर्ज देऊन जरंडेश्वरच्या कर्जाची माहिती मागितली आहे. ही माहिती देण्यास अध्यक्षांनी होकार दिला नाही, तर २९ तारखेला संचालक मंडळाच्या बैठकीत विचार करून आम्ही तुम्हाला माहिती देण्याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या पूर्वी अनेक जिल्हा बँका अवसायानात निघाल्या आहेत. या बँका संचालकांच्या मालकीच्या नसून त्या सर्वसामान्य शेतकरी सभासदांच्या मालकीच्या आहेत.

Udayanraje Bhosale
निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी; आमदार पाटलांसह राजपुरे, खर्डेकर बिनविरोध

सभासदांमुळे ही संचालक मंडळी बँकेवर निवडून जातात आज जे कोणी अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक आहेत ते शेतकरी सभासदांमुळे आहेत. तुम्ही संचालक म्हणून बँकेवर जाता त्यावेळी प्रत्येकाची जाबबदारी असते. लोकांनी तुम्हाला सभासदांची मालमत्ता, पैसा यांची देखरेख करण्यासाठी पाठविलेले असेते. ज्यावेळी जरंडेश्वर कारखान्याला यांनी कर्ज दिले त्यावेळपासून मी आवाज उठवत आहे. जरंडेश्वर कारखाना पूर्वी सहकारी तत्वावर होता आता त्यानंतर खासगीकरण होण्याकरिता बँकेतून कर्ज दिले आहे. त्यातूनच हा कारखाना काडीमोल भावात विकत घेतला. हे कर्ज मंजूर करताना शेतकऱ्यांच्या विचार का केला, असा प्रश्न उदयनराजेंनी उपस्थित केला. जरंडेश्वरला कर्ज दिले, त्यावेळी आम्ही गुरू कमोडिटीचा गुरू कोण हे सुध्दा विचाले होते. त्याचे उत्तर आजही मिळालेले नाही. हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

Udayanraje Bhosale
भाजपचा मास्टर प्लान; निवडणुकीपूर्वीच 100 आमदारांचं तिकीट कापणार

खासगीकरण केल्यानंतर शेतकरी सभासदांचे त्यांनी पैसेही परत केलेले नाहीत. खासगीकरण केल्यानंतर सात संचालक असतात. किमान त्यांना कारखान्यात सभासद तरी करू घ्यायला हवे होते. नेमके काय चाललंय हेच मला कळत नाही, पण मी लोकांच्या हिताचे बोलत आहे. त्यामुळे मलाच दोषी ठरविले जाते. येथे माझा कोणताही स्वार्थ नाही. शेतकऱ्यांसाठी बेंबीच्या देटापासून बोलतात, की समोरच्याला वाटते की यांची खरोखरच तळमळ आहे. ही प्रगती नव्हे अधोगती आहे. यांनी तळागाळातील लोकांना गाळात घालण्याचे काम केले आहे. हे होऊ नये म्हणूनच मी जिल्हा बँकेत संचालक म्हणून आलेलो आहे. कोणत्या पदात स्वारस्य नाही. मागील काळात अनेकांनी जागा आडविल्या होत्या. पण, मी होतो म्हणून किमान चार जण तरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले, असंही त्यांनी सांगितलं.

Udayanraje Bhosale
राष्ट्रवादीच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी भाजप मैदानात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.