'महावितरण'चा अजब कारभार; माजी सैनिकास वीज न जोडताच वीजबिल!

MSEDCL
MSEDCLesakal
Updated on

कातरखटाव (सातारा) : वाकेश्वर (ता. खटाव) येथील माजी सैनिक कैलासराव धुमाळ (Former soldier Kailasrao Dhumal) यांनी त्यांच्या भुरकवडी (ता. खटाव) येथे कृषीपंपासाठी (Agricultural pump) वीज जोडणीसाठी केवळ अर्ज केलेला असताना वीजजोडणी मिळण्यापूर्वीच ‘महावितरण’ने १२०० रुपयांचे वीजबिल पाठवल्याने ‘महावितरण’चा (MSEDCL) कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाकेश्वर येथील श्री. धुमाळ यांची भुरकवडी येथे शेती आहे. या शेतीसाठी (Farm) त्यांनी सन २०१५ मध्ये कृषीपंपासाठी वीजजोडणीची मागणी केली होती. (MSEDCL Has Given Electricity Bill To The Ex-serviceman Without Connecting The Electricity Connection)

Summary

गेल्या दोन दिवसांपूर्वी माजी सैनिक कैलासराव धुमाळ यांना सदर कनेक्शनचे १२०० रुपयांचे वीजबिल आले आहे.

या जोडणीसाठी एकूण चार खांबांची मंजुरी त्यांना मिळाली होती. या भागात ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर वीजजोडणी दिली जाईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर सन २०२० मध्ये ट्रान्सफॉर्मरचे काम करण्यात आले. त्यामुळे श्री. धुमाळ यांनी पुन्हा ‘महावितरण’कडे चौकशी केली असता संबंधित ठेकेदाराकडून आपणास आठ दिवसांत वीज कनेक्शन (Power connection) दिले जाईल, असे ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

MSEDCL
ओबीसी आरक्षणासाठी कऱ्हाडात भाजपचा 'चक्काजाम'

परंतु, गेल्या दोन दिवसांपूर्वी श्री. धुमाळ यांना सदर कनेक्शनचे १२०० रुपयांचे वीजबिल (Electricity bill) आले असून या बिलावर २१ जानेवारी २०२१ रोजी वीज कनेक्शन जोडणी केल्याचे दिसून येत आहे. महत्त्‍वाचे म्हणजे या भागातील ट्रान्सफॉर्मर अद्याप सुरू झालेला नाही, कामाची पूर्तता झालेली नाही, अजून कनेक्शनही जोडलेले नाही, तरीही वीज बिल कसे? असा प्रश्न श्री. धुमाळ यांना पडला आहे. या प्रकाराबाबत श्री. धुमाळ यांनी महावितरण कंपनीकडे संबंधित ठेकेदार ग्राहकांची फसवणूक करत असल्याबाबतची तक्रार दाखल केली असून, ठेकेदारावर कारवाई करावी व चुकीचे आलेले वीजबिल रद्द करावे, अशी मागणी केली आहे.

MSEDCL Has Given Electricity Bill To The Ex-serviceman Without Connecting The Electricity Connection

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.