Mukhyamantri Tirth Darshan Yojana : तीर्थ दर्शन योजनेचे पुण्य मिळणार चिठ्ठीने; लाभार्थी निवड होणार लॉटरीद्वारे

देशासह राज्यातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासनाने सुरू केली आहे.
Mukhyamantri Tirth Darshan Yojana
Mukhyamantri Tirth Darshan Yojanasakal
Updated on

सातारा - देशासह राज्यातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शासनाने सुरू केली आहे. यामध्ये साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना या यात्रेचा मोफत लाभ घेता येणार आहे. त्यासाठी देशभरातील ७३, तर राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना काही अटीवर परवानगी दिली जाणार आहे. यासाठी समाज कल्याण विभागाकडून ही योजना राबवली जाणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून या योजनेवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता शासनाच्या वतीने त्यांच्या आवडीनुसार मोफत तीर्थ दर्शन करता येणार आहे.

काय आहे योजना...

ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याच्या उतार वयात तीर्थ स्थळी जाण्याची इच्छा असते. पुण्यकर्म म्हणून ही त्यांची इच्छा असूनही केवळ आर्थिक परिस्थिती नसल्याने अशा व्यक्तींना तीर्थस्थळी जाता येत नाही, तसेच सोबत कोण नसल्यानेही ही इच्छा पूर्ण करता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्राला मोफत भेट देण्याची व दर्शन घेण्याची संधी मिळावी, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

खर्चाची तरतूद अशी...

या योजनेत एका तीर्थस्थळाला जाण्यासाठी पाच व्यक्तींना एकाच वेळी लाभ घेता येणार आहे. प्रवासाची कमाल मर्यादी प्रतिव्यक्ती ३० हजार रुपये असेल. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन आणि निवास व इतर बाबींचा समावेश असेल.

आवश्यक पात्रता...

कोणीही ६० वर्षांवरील व्यक्तीचा यामध्ये सहभागी होऊ शकते. राज्यातील रहिवासी असावा, तसेच लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे.

अर्ज कसा करावा...

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल, तसेच सेतू केंद्रातूनही करता येईल. लाभार्थ्याचे आधार कार्ड, रेशन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र आवश्यक, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाइकांचा मोबाईल नंबर.

निवड अशी होते...

जिल्ह्यासाठी कोटा निश्चित केला असून, त्यानुसार जिल्हास्तरीय समिती यात्रेकरू लाभार्थीची निवड करणार आहे. त्यांची यादी बनवून लॉटरी पद्धतीने यात्रेसाठी निवड केली जाईल. जादा असलेल्या संख्येनुसार प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयात, तसेच समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्या फलकावर लावली जाईल. यादी अंतिम करण्याचे काम समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्याकडूनच होईल.

यात्रेचे नियोजन असे असेल...

निवड केलेल्यांची यादी अधिकृत टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सीला दिली जाईल. त्यानुसार प्रवाशांच्या संख्येनुसार यात्रेच्या ठिकाणी जाण्याचे नियोजन करेल. प्रवाशांना आवश्यक सुविधा शासन करणार आहे. यात्रेकरूंनी नियोजित स्थळी स्वखर्चाने जावे लागेल.

सहायक, जीवनसाथी नेता येणार...

ज्या ज्येष्ठ नागरिकांना सोबत सहायक किंवा जीवनसाथी सोबत घेऊन जायचे असेल, तरीही परवानगी मिळणार आहे; पण त्यासाठी आरोग्य व इतर निकषास पात्र ठरणे आवश्यक आहे.

या तीर्थक्षेत्रांचा समावेश...

देशातील ७३, तर राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार आहे. यामध्ये वैष्णोदेवी, अमरनाथ गुहा, अक्षरधाम, बद्रीनाथ, काशी विश्वेश्वर, कामाख्या देवी, तिरुपती बालाजी, कैलासनाथ मंदिर कांचीपुरम आदींसह सिद्धिविनायक ते चिंतामणी कळंबपर्यंतच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.