आता इमारती पडल्यास अधिकारीच राहणार जबाबदार; 'सीओं'चे सक्त आदेश

 Building Collapses
Building Collapsesesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : पावसाळ्यापूर्वी (Heavy Rain) धोकादायक इमारती उतरविण्याचे शासनाचे निर्देश असताना येथे तब्बल ५३ धोकादायक इमारतींवर (Buildings) थेट कारवाई न करता निव्वळ कागदोपत्री घोडी नाचवणे पालिका अधिकाऱ्यांच्या (Municipal Officer) अंगलट आले आहे. नोटीस बजावून कारवाईचा फार्स करणाऱ्या अधिकाऱ्यांना पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके (Chief Ramakant Dake) यांनी नोटिसा काढल्या आहेत. कोणतीही मोठी दुर्घटना झाल्यास त्या संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच संबंधितांची जबाबदारी निश्‍चित केली आहे. (Municipal Officer Will Be Responsible If The Building Collapses Satara Marathi News)

Summary

शहरातील सात पेठांमध्ये तब्बल ५३ धोकादायक इमारती असून, त्यात मोठ्या मजल्याच्या इमारतींची संख्या सर्वाधिक आहे.

शहरातील सात पेठांमध्ये तब्बल ५३ धोकादायक इमारती असून, त्यात मोठ्या मजल्याच्या इमारतींची संख्या सर्वाधिक आहे. त्यातील बहुतांशी इमारतींत आजही लोक राहतात. त्यावर ‘सकाळ’ने प्रकाश टाकला. त्याची दखल घेऊन पालिकेचे (Karad Municipality) मुख्याधिकारी डाके यांनी इमारतींवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. इमारती उतरविण्याची कारवाईची गरज असताना त्या का उतरविल्या नाहीत? असा लेखी खुलासा करण्याचे आदेशही दिले आहेत. पावसाळ्यात एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतर त्याला संबंधित अधिकारीच जबाबदार राहील, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे. त्या सगळ्यांची जबाबदारी त्या संबंधित अधिकाऱ्यांवर निश्‍चित केली आहे. दुर्घटना घडल्यास संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीसह कारवाईलाही सामोरे जावे लागणार आहे.

 Building Collapses
काँग्रेसमध्ये कुरघोड्यांचे राजकारण; अध्यक्षपदावरून कलगीतुरा

त्यामुळे कारवाईचे केवळ कागदोपत्री घोडी नाचवणारे अधिकारी चांगलेच हादरले आहेत. धोकादायक इमारतींची संख्या कमी होणे गरजेचे असते. मागील धोकादायक इमारती का पाडल्या नाहीत? नव्याने वाढलेल्यांवर काय कारवाई केली, याचाही खुलासा आता अधिकाऱ्यांना करावा लागणार आहे. नागरिकांना धोका निर्माण झाल्यास ते अधिक गंभीर आहे. त्यामुळेच अधिकाऱ्यांना खुलासा करून येत्या काही दिवसांत त्या इमारती पाडण्यासही पालिका सुरवात करण्याची शक्यता आहे, असे मुख्याधिकारी डाके यांनी स्पष्ट केले.

 Building Collapses
जीवघेण्या लढ्यात शिवसेनेच्या रुग्णवाहिका बनल्या 'जीवनदायिनी'

शहरातील निम्‍म्याहून अधिक धोकादायक इमारतींत अजूनही नागरिकांचे वास्तव्य आहे. याची पालिकेने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे शहरातील जास्त धोकादायक इमारती मोकळ्या करून त्या पाडण्याची पालिकेने तयार केली आहे. त्या अनुषंगानेही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

Municipal Officer Will Be Responsible If The Building Collapses Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.