गावातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सातारा : सातारा तालुक्यातील (Satara Taluka) एका गावात राहणाऱ्या पाच वर्षीय बालकाचा मृतदेह काल रात्री राहत्या घरातील स्वयंपाक घरात आढळून आला. याची माहिती मिळाल्यानंतर, सातारा तालुका पोलिसांनी (Satara Taluka Police) घटनास्थळाची पाहणी करत १६ वर्षीय अल्पवयीनास संशयावरुन ताब्यात घेतलंय. त्या अल्पवयीनानं धारदार शस्त्रानं वार करत त्या पाच वर्षीय बालकाचा खू्न केल्याची कबुली दिली असून हा प्रकार लैगिंक अत्याचारातून घडल्याचा पोलिसांचा संशय आहे.
मुळचा माण तालुक्यातील (Maan Taluka) असणारा पाच वर्षीय बालक गेले काही वर्षे आपल्या आई-वडिलांसह सातारा तालुक्यातील एका गावात भाड्यानं दोन खोल्या घेऊन राहण्यास होता. काल त्याचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. सायंकाळी त्याचे वडील कामावरुन परतले. यावेळी त्यांना पाच वर्षीय मुलगा घरातल्या पुढच्या खोलीत दिसला नाही. त्यांनी शोध घेतला, मात्र तो कोठेही आढळला नाही. यानंतर ते स्वयंपाक घरात गेले असता, त्यांना आतील स्वयंपाक खोलीत रक्तानं माखलेला मुलगा आढळला. त्यांनी त्यास उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळं त्यांनी इतरांना मदतीसाठी बोलावत बेशुध्दावस्थेत असणाऱ्या पाच वर्षीय मुलास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणीअंती पाच वर्षीय त्या बालकास मृत घोषित करण्यात आले.
अज्ञातानं त्याचा खून केल्याचे समोर आल्यानंतर सातारा तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी माहिती घेत घटनास्थळ गाठले आणि तपास सुरु केला. याचदरम्यान घटनास्थळास पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल (Ajay Kumar Bansal), अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी भेट देत तपासाच्या सूचना केल्या. पोलिसांनी घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करत त्याच गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीनास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानं चौकशीत पाच वर्षीय बालकाचा खून केल्याचे कबुल केलं आहे. सदर प्रकार लैगिंक अत्याचाराच्या कारणावरुन झाल्याचा पोलिसांचा संशय असून त्याद्दष्टीनं तपास सुरु आहे. याची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.