Karad : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीला तिसऱ्या मजल्यावरून खाली ढकललं; अनैतिक संबंधावरुन मित्रानेच काढला काटा?

आरोशीची आई दिप्ती सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ध्रुववर पोलिसांनी (Karad Police) गुन्हा दाखल केला आहे.
Karad Murder Case
Karad Murder Caseesakal
Updated on
Summary

काल मध्यरात्रीच्या सुमारास आरोशीची आई दिप्ती सिंग यांनी पोलिसात फिर्याद दिली.

कऱ्हाड : वैद्यकीय शिक्षण (Medical Education) घेणाऱ्या युवतीच्या आकस्मित मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा पोलिसात दाखल झाला. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास झालेल्या आकस्मित मृत्यूचा काल रात्री खुलासा झाला. त्या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ध्रुव राजेशकुमार चिक्कारी (वय २१, रा. हरियाणा) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

आरोशी सिंग (वय २१, रा. बिहार) असे मृत युवतीचे नाव आहे. तिची आई दिप्ती सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ध्रुववर पोलिसांनी (Karad Police) गुन्हा दाखल केला आहे. ध्रुवही जखमी आहे, त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी सांगितले की, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आरोशी सिंग हिचा मंगळवारी मध्यरात्री मलकापूर येथील सनसिटी कॉम्पलेक्समधील तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. तिला तिच्याच सहकारी ध्रुवने अन्य लोकांच्या मदतीने त्वरित रूग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसही त्वरित घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी त्या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली होती.

Karad Murder Case
Police Constable : पोलिस कॉन्स्टेबलचा घरात घुसून धिंगाणा; महिलेची थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार, नेमकं काय घडलं?

आरोशी व ध्रुव मलकापुरातच वैद्यकीय शिक्षण घेत होते. दोघांमध्ये नातेही निर्माण झाले होते. तीन वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. आरोशी त्याच महाविद्यालयाच्या कॅम्पसमधील वसतीगृहात राहत होती. तर, ध्रुव सनसिटी येथे तिसऱ्या मजल्यावर स्वतंत्र भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता. आरोशी व त्याची ओळख असल्याने ती अधून-मधून त्याच्याकडे ये-जा करत होती. अलीकडच्या काळात त्यांच्यात वाद होत होता. आरोशीचे अन्य एकाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय ध्रुवला होता.

त्याबाबत आरोशीने तिच्या आईलाही कल्पना दिली होती. आरोशी मंगळवारीही ध्रुवच्या त्या फ्लॅटवर आली होती. तेथे दोघांनीही बराचवेळ गप्पाही मारल्या, रात्री अकराच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोशी तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याचे पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली. ती खाली पडल्याने तिला वाचवण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरून ध्रुवही मागे धावत आला. त्यामुळे जिन्यात तो पडल्याने तोही जखमी झाला. त्याच अवस्थेत अन्य लोकांच्या मदतीने त्याने तिला रूग्णालयात नेले. मात्र, त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी त्वरित आरोशीच्या नातेवाईकांना माहिती दिली.

Karad Murder Case
Karad Crime : कऱ्हाड तालुक्यातील डाॅक्टरानं रूग्णालयातच उचललं टोकाचं पाऊल; आंघोळ करुन दवाखान्यात आले अन्..

आरोशीचे नातेवाईक काल सकाळी येथे पोचले आरोशीच्या आईने पोलिसांना ध्रुव तिला मारत होता, अशी माहिती आरोशीनेच मला फोनवरून दिली होती, अशी माहिती पोलिसांना दिल्याने दिवसभर पोलिसांनी त्या प्रकरणाचा तपास केला. काल मध्यरात्रीच्या सुमारास आरोशीची आई दिप्ती सिंग यांनी पोलिसात फिर्याद दिली. दिप्ती सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीत ध्रुव तिच्यावर संशय घेवून तिला मारहाण करायचा, तो सतत तिला त्रास देत होता, असे आरोशीने फोनवरून सांगितले होते.

त्यामुळे मंगळवारी रात्री त्यानेच तिला इमारतीवरून खाली ढकलून मारले आहे, असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ध्रुव जखमी आहे, त्याच्यावरही खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सुधारताच त्यालाही ताब्यात घेण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.