यती नरसिंहानंद सरस्वतींचे इस्लामविरोधी वक्तव्ये; महाबळेश्वरातील मुस्लिम समाज आक्रमक, कारवाईची केली मागणी

Muslim Community : मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून महाबळेश्वरमधील मुस्लिम समाजाने त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला.
Muslim Community
Muslim Communityesakal
Updated on
Summary

सामाजिक शांतता बिघडवणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाबळेश्वर तालुक्यातील मुस्लिम समाजाने केली आहे.

महाबळेश्‍‍वर : दासना मंदिराचे प्रमुख पुजारी यती नरसिंहानंद सरस्वती (Yeti Narasimhananda Saraswati) यांनी इस्लामविरोधी वक्तव्ये केल्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून महाबळेश्वरमधील मुस्लिम समाजाने त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. सामाजिक शांतता बिघडवणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाबळेश्वर तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

प्रारंभी शहरातील जामा मशीद येथे महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुक्यातील मुस्लिम समाजबांधवांसह (Muslim Community) विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी मनोगत व्यक्त केले.

Muslim Community
रामराजे हाती घेणार 'तुतारी'? अजितदादांना धक्का देण्याच्या तयारीत; प्रफुल्ल पटेलांनी काढली समजूत, पण..

यावेळी माजी सभापती संजय गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष अफजल सुतार, अर्बन बँकेचे संचालक राजेश कुंभारदरे, उपाध्यक्ष शरद बावळेकर, कासम कादर नालबंद, अप्पासाहेब साळुंखे, माजी नगरसेवक संदीप साळुंखे, विशाल तोष्णीवाल, रवींद्र कुंभारदरे, जावेद वलगे, फकीरभाई वलगे, असिफभाई मुलाणी, मिनारा मस्जिद सुन्नत जमात ट्रस्टचे अध्यक्ष रियाजभाई सय्यद, तौफिक पटवेकर, अकबर शारवान, रियाज डांगे, रमाकांत शिंदे, प्रवीण शिंदे, सचिन वागदरे, किरण शिंदे, योगेश बावळेकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.