गणेशोत्सवादरम्यान मुस्लिम समाजानं घेतला मोठा निर्णय; पोलिसांसह प्रशासनही करतंय कौतुक, असं काय घडलं?

अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद एकाच दिवशी येत आहेत.
Paigambar Jayanti Anant Chaturdashi
Paigambar Jayanti Anant Chaturdashiesakal
Updated on
Summary

मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंतीची शाही दरबार मिरवणूक त्या दिवशी न काढता ती एक ऑक्टोबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे.

कऱ्हाड : अनंत चतुर्दशी व मोहंमद पैगंबर (Paigambar Jayanti) यांची जयंती एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे त्या दिवशी प्रशासनावर ताण आहे. मात्र, मुस्लिम समाजाने (Muslim Community) घेतलेल्या निर्णयाने तो ताण मोकळा झाला आहे. त्या दिवशी पैगंबर जयंतीची मिरवणूक न काढता ती दोन दिवसांनी एक ऑक्टोबरला काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे.

मिरवणुकीचे आयोजक साबिरमियॉ मुल्ला यांनी त्याची माहिती दिली. त्यामुळे सामाजिक सलोख्यासह ऐक्याचेच प्रतीक म्हणून निर्णयाचे प्रशासनासह नागरिकांनी स्वागत केले आहे. अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद म्हणजेच पैगंबर जयंती एकाच दिवशी गुरुवारी (ता. २८) आहे. प्रशासनही त्यावर विचार करत होते.

Paigambar Jayanti Anant Chaturdashi
Kolhapur Ganeshotsav : कोल्हापुरात दुसऱ्या दिवशीही DJ चा दणदणाट; लेसर शोचाही झगमगाट, गणेशमूर्तींचं आगमन सुरूच

मात्र, मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंतीची शाही दरबार मिरवणूक त्या दिवशी न काढता ती एक ऑक्टोबरला काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पैगंबर जयंती उत्सव साजरा करणाऱ्या आयोजकांची बैठक झाल्याचे साबिरमियॉ मुल्ला यांनी सांगितले. त्याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली आहे.

Paigambar Jayanti Anant Chaturdashi
Kalubai Temple : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रातील 'हे' प्रसिद्ध मंदिर आठ दिवस राहणार बंद, काय आहे कारण?

शहरातील प्रत्येक समारंभात, उत्सवात सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने एकत्र येऊन सहभागी होतात. यावर्षी उत्सव मोठ्या दिमाखात सुरू आहे. मात्र, अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद एकाच दिवशी येत आहेत. त्यावर निर्णय काय घ्यायचा हा विषय होता. मात्र, त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. पैगंबर जयंती उत्सव समितीचे श्री. मुल्ला यांनी त्या दिवशीची मिरवणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्पष्ट केले.

Paigambar Jayanti Anant Chaturdashi
Kolhapur Politics : जे चांगलं आहे, त्याला निश्‍चित पाठिंबा दिला जाईल पण..; राजाराम कारखान्याबाबत काय म्हणाले सतेज पाटील?

एक ऑक्टोबरला पैगंबर जयंतीची शाही दरबार मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता जामा मशिद येथून सुरू होईल. प्रतिवर्षाप्रमाणे मिरवणूक मार्गावरून मिरवणूक शहरातून काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याच्या आवाहनही या वेळी करण्यात आले आहे.

Paigambar Jayanti Anant Chaturdashi
Kolhapur Ganeshotsav : पोलिसांसमोरच DJ चा दणदणाट; गणेश मंडळांना पाठवणार नोटिसा, पोलिस अधीक्षक अॅक्शन मोडवर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()