Narendra Modi: केंद्रातील सरकार टिकणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

Prithviraj Chavan : लोकसभेवरील मोदींचे नियंत्रण जाईल त्यामुळे ते उपसभापती विरोधी पक्षाला देणार नाहीत असे वाटते.
Narendra Modi: केंद्रातील सरकार टिकणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Narendra Modi and Prithviraj Chavan
Updated on

Satara: देशात सत्तेत आलेल्या एनडीए आघाडीच्या सरकारमध्ये एकवाक्यता नाही. त्यातच चंद्रबाबू नायडु व नितीशकुमारांनी केंद्राकडे आंध्र प्रदेश व बिहारला विशेष राज्याचा दर्जाची मागणी केली आहे.

ते दिले तर अन्य राज्येही मागणी करणार. त्यामुळे केंद्रातील एनडीए आघाडीचे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुका या कॉंग्रेस महाविकास आघाडीबरोबरच लढेल असे स्पष्ट करुन साताऱ्यातील पराभवाची कारण मिमांसा पंचायत समिती गणनिहाय बैठका घेऊ करणार आहोत असे ही त्यांनी सांगीतले.

कऱ्हाड (जि.सातारा) येथील बाजार समितीच्या मुख्य कमानीचे उद्घाटन झाल्यानंतर आमदार चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळखर उपस्थिती होते. आमदार चव्हाण म्हणाले, देशात अपेक्षेप्रमाणे मोदींना मतदारांनी नाकारले त्यामुळे मोदींना नितेश कुमार व चंद्र बाबू यांची साथ घ्यावी लागली आणि सरकार आले.

राज्यात आम्ही अंदाज बांधल्यानुसार आमच्या जागा निवडून आल्या आहेत. केंद्रात सरकार जरी एनडीए आघाडीचे आले तरी राज्यसभेचे उपसभापती पद विरोधी पक्षाला देण्याची आपल्याकडे परंपरा आहे. मात्र तसे केले तर लोकसभेवरील मोदींचे नियंत्रण जाईल त्यामुळे ते उपसभापती विरोधी पक्षाला देणार नाहीत असे वाटते.

मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातील घटनेसंदर्भात ते म्हणाले, उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात निवडणूक आयोगाकडून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मात्र त्या एफआयआर ची माहिती दिली जात नाही, यामुळे याच्यामागे काही गौडबंगाल तर नाही ना? अशी शंका येत आहे.

Narendra Modi: केंद्रातील सरकार टिकणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Narendra Modi: जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदींच्या व्हिडीओवर कंगनानं दिली प्रतिक्रिया; म्हणाली, "मोदीजींचा सर्वात चांगला गुण म्हणजे ते..."

मतमोजणी ठिकाणी फक्त निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनाच मोबाईल वापरण्याची परवानगी असते, मात्र तेथील विजयी उमेदवाराच्या मेहुण्याकडे मोबाईल कसा काय आला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आगामी विधानसभेच्या निवडणुकाबाबत ते म्हणाले, विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच आम्ही लढणार आहोत. त्या संदर्भात औपचारिक चर्चा झाली आहे. महाविकास आघाडी लोकांसाठी योग्य व आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करून जाहीरनामा मांडणार आहेत. या साठी आम्ही जाहीरनामा समिती लवकर स्थापन करणार आहोत.

लोकसभेतील अपयशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वरिष्ठांकडे कार्यमुक्त करण्याची मागणी केली त्यावर ते म्हणाले, महाराष्ट्रात सध्यतरी देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मोठा चेहरा नाही. विनोद तावडे आहेत मात्र त्यांचा राज्याशी सध्या संपर्क कमी आहे त्यामुळं त्यांना राज्याची जबाबदारी झेपेल असे वाटत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष फोडले हे जरी खरे असले तरी मोदींच्या परवानगी शिवाय हे शक्य होणार नाही. फडणवीसांनी जे काही केले ते मोदींच्या सांगण्यावरून केले असे म्हणत यावर अधिक भाषय केले नाही.

Narendra Modi: केंद्रातील सरकार टिकणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
PM Narendra Modi: खलिस्तान समर्थकांनी महात्मा गांधींचा पुतळा फोडला; PM मोदींच्या इटली दौऱ्यापूर्वी घृणास्पद कृत्य

वंचीतला सन्मापुर्वक जागा देणार

वंचित आघाडीला लोकसभेसाठी आम्ही पाच जागा देत होतो. ते जर आमच्याबरोबर आले तर विधानसभेला देखील सन्मानपूर्वक जागा आम्ही त्यांना देऊ असे स्पष्ट करुन आमदार चव्हाण म्हणाले, लोकसभेला महाविकास आघाडी बरोबर वंचित आली असती तर प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडून देखील आले असते आणि लोकसभेत डॉ. आंबेडकरांच्या कुटुंबातील वारसदार म्हणून त्यांची देशभर ओळख झाली असती, मात्र तसे झाले नाही.

धार्मिक धुव्रीकरणामुळे कऱ्हाड दक्षिणमध्ये धक्का

लोकसभा निवडणुकीत कऱ्हाड दक्षिण मधील मतदानाच्या आकडेवारी ही धक्कादायक आहे. विरोधकांकडून या लोकसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे पैशांचे वाटप झाले. याचबरोबर धार्मिक ध्रुवीकरण देखील मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे दक्षिण मध्ये या धक्कादायक निकालाची कारणमीमांसा करण्यासाठी लवकरच पंचायत समिती गण निहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका आम्ही घेणार आहोत. यात दक्षिण मध्ये नेमके आमचे कुठे चुकले का चुकले या सर्वांची कारणे शोधणार आहोत असे आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Narendra Modi: केंद्रातील सरकार टिकणार नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Narendra Modi Varanasi: वाराणसीतून प्रियांका गांधी लढल्या असत्या तर मोदी 3 लाख मतांनी हारले असते; राहुल गांधींचा मोठा दावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.