सातारा : पडळ (ता. खटाव) येथील के. एम. शुगर कारखान्यातील एका विभागाच्या अधिकाऱ्याचा येथील एका खासगी रुग्णालयात संशयास्पद मृत्यू झाला. जगदीप धोंडीराम थोरात (वय 40, रा. गोवारे, ता. कऱ्हाड) असे मृताचे नाव आहे. दरम्यान संबंधित घटनेची चाैकशी केल्यानंतर पाेलिसांनी सुमारे 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या माजी आमदारांसह राजकीय कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
गोवारे येथील जगदीप थोरात हे पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यांत प्रोसेसिंग विभागाचे प्रमुख होते. कारखान्यात अफरातफर झाल्याच्या कारणावरून त्यांना जबाबदार धरले होते. त्या कारणावरून थोरात यांना मारहाण झाली आहे. तशा त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी हाेत्या. ही घटना बुधवारी (ता. 10) रात्री उशिरा घडली. थोरात यांना गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्रास होऊ लागला. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना सकाळी सहा वाजता येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पाेलिसांनी दिली. थोरात यांना मारहाण करणाऱ्या संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी नातेवाईकांनी भूमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पाेलिसांनी या घटनेची चाैकशी केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला हाेता.
आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला आकार आणि आशय देणारी माझी प्रिय पत्नी...
दरम्यान पोलिस ठाण्यात अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली होती. संबंधित घटनेची चाैकशी झाल्यानंतर थोरात यांच्या मृत्यूप्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे, मनोज घोरपडे, संग्राम घोरपडे, संचालक महेश घार्गे, शेडगे (मामा), सनि क्षीरसागर, पी. ए. अंजनकुमार, अशोक नलवडे आदींसह अन्य दहा ते बारा जणांविरोधात वडूज पाेलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सर्व संशयींतांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 302, 143, 147, 148,149,323 लावण्यात आले आहे. घोरपडे बंधूंसह इतर चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतीरिक्त पोलिस अधिक्षक धिरज पाटील, पोलिस उपअधीक्षक निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख तपास करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.