'रवी राणांमुळेच नवनीत राणांचा पराभव, त्या सतत TV वर दिसायच्या म्हणून..'; बच्चू कडूंचा खबळजनक दावा

नवनीत राणा भाजपमध्ये आणि त्यांचे पती स्वाभिमान पार्टीत असल्याने लोकांत संभ्रम निर्माण होऊन फसगत झाली.
Prahar Party MLA Bacchu Kadu
Prahar Party MLA Bacchu Kaduesakal
Updated on
Summary

'नवनीत राणा सतत टी.व्ही. वर दिसायच्या. त्यामुळे राणा (Ravi Rana) जरा दबून गेला होता. त्यांच्या घरात अंतर्गत कलह आहे.'

कऱ्हाड : मी वीस वर्षे कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता 'प्रहार' कार्यकर्त्यांच्या, लोकांच्या जीवावर चार वेळा निवडून आलो आहे. त्यामुळे पाडणे किंवा निवडून येणे यावर आता रवी राणा यांनी बोलणे योग्य नाही. मी राणांसारखा भाजपचा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचा पाठिंबा घेऊन मी निवडून आलेलो नाही. मी स्वतःच्या जीवावर निवडून आलेलो आहे. स्वाभिमान पार्टीनेच भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) यांना पाडले आहे. घरचीच व्यक्ती मोठ होताना रवी राणा पाहू शकले नाहीत, असा खळबळजनक दावा प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी येथे केला.

कोकण दौऱ्यावरुन पुण्याला जात असताना आमदार कडू यांनी कऱ्हाड (जि. सातारा) येथे पत्रकारांशी संवाद साधला. मनोज माळी, शिवाजी चव्हाण, भानुदास डाईंगडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार कडू म्हणाले, नवनीत राणा सतत टी.व्ही. वर दिसायच्या. त्यामुळे राणा (Ravi Rana) जरा दबून गेला होता. त्यांच्या घरात अंतर्गत कलह आहे. स्वाभिमान पार्टीनेच भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांना पाडले आहे.

Prahar Party MLA Bacchu Kadu
'OBC आरक्षणाबाबत उद्याच कॅबिनेट बैठकीत चर्चा'; सरकारच्या शिष्टमंडळाचं आंदोनकर्त्या लक्ष्मण हाकेंना मोठं आश्वासन

घरचीच व्यक्ती मोठ होताना रवी राणा पाहू शकले नाहीत. नवनीत राणा भाजपमध्ये आणि त्यांचे पती स्वाभिमान पार्टीत असल्याने लोकांत संभ्रम निर्माण होऊन फसगत झाली. त्यामुळेच त्यांचा पराभव झाला. खासदार वानखेडे यांना विकास कामासाठी निधी आणण्यासाठी काय करावे हे माहिती आहे. त्यामुळे रवी राणांनी त्यांना सांगायची गरज नाही. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे उठसुट आरोप करायचे सुरु आहे. त्यांना पराभव पचवता आलेला नाही आणि स्वतःमुळे पराभव झाला हे राणांना समजून आलेले आहे.

Prahar Party MLA Bacchu Kadu
डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर सर्व भाषिक काव्यरचना ग्रंथ प्रकाशित होणार; साहित्यिकांना काव्यरचना पाठवण्याचं 'बार्टी'चं आवाहन

ते पुढे म्हणाले, आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी १०८ वेळा बच्चू कडूचे नाव घेतले. त्यामुळे मलाच त्यांच्याकडे डॉक्टरला पाठावावे लागेल. भाजपचे पदाधिकारी राणा यांना उमेदवारी देऊ नये असे म्हणत होते. बायको भाजपात आणि हे स्वाभिमानमध्ये राहिले. हे भाजपच्या कार्यकर्त्यांना पटलेले नाही. त्यांनी विरोधात मते दिले आहेत. उठसुठ मला बोलले की, त्याचा मोठा नेता खुश होतो म्हणून ते माझ्यावर टिका करत आहेत. मोठ्या नेत्याला खुश करण्यासाठी ते आरोप करत राहतात. त्यांच्या आरोपात आता काहीही तथ्य राहिलेले नाही. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यामुळे आता त्यांना कोर्टातूनच उत्तर देणार आहे, त्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.