Latest satara news: महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार नितीन पाटील यांनी आज संसद भवनात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडून सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, खासदार धैर्यशील पाटील, तसेच जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, मनोज पवार, प्रदीप विधाते, राजेश वाठारकर, सूर्यकांत बर्गे आदी उपस्थित होते.