Sharad Pawar : एकेकाळी 9 आमदार, 2 खासदार असणाऱ्या बालेकिल्ल्याला भाजपनं पोखरलं; पवारांनी लक्ष्य घालण्याची गरज!

आज जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आमदार व एक खासदार अशी अवस्था आहे.
Bazar Samiti election Sharad Pawar NCP Shashikant Shinde
Bazar Samiti election Sharad Pawar NCP Shashikant Shindeesakal
Updated on
Summary

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आता राहिला नाही, असे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी साताऱ्यात केले होते.

सातारा : बालेकिल्ला असूनही राष्ट्रवादीला (NCP) बाजार समितीच्या निवडणुकीत (Bazar Samiti Election) यश मिळवता आलेले नाही. उलट राष्ट्रवादी व भाजपची (BJP) राज्यात कुस्ती आणि जिल्ह्यात दोस्ती या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळाली.

खरोखरच जिल्ह्यातील राष्ट्रवादीला अपयशाचे ग्रहण लागले आहे. यातून पक्षाला बाहेर काढून ऊर्जितावस्था देण्यासाठी बालेकिल्ल्यावरील राष्ट्रवादीची ढिली होत चाललेली पकड पुन्हा घट्ट करण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी लक्ष घालून जिल्ह्यात पक्षाची वज्रमूठ तयार करणे आवश्यक आहे.

'राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आता राहिला नाही'

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आता राहिला नाही, असे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी साताऱ्यात केले होते. हे त्यांचे वक्तव्य साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हसण्यावारी नेले आहे; पण खरोखरच राष्ट्रवादीची परिस्थिती अशीच झाली आहे. १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्ह्यात पक्षाचे नऊ आमदार व दोन खासदार निवडून आले होते. आज त्याच जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आमदार व एक खासदार अशी अवस्था आहे. बालेकिल्ला असूनही राष्ट्रवादीला नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत काही ठिकाणी भाजपसोबत युती करावी लागली आहे. त्यामुळे ज्या तालुक्यात राष्ट्रवादी स्ट्रॉँग आहे, त्या ठिकाणीच पक्षाला यश मिळवता आलेले नाही.

Bazar Samiti election Sharad Pawar NCP Shashikant Shinde
Karnataka Election Result : कर्नाटकात पराभव झाला तरी 'हा' विजय भाजपला सुखावणारा असेल!

भाजपनं आतून बालेकिल्लाला पोखरलं

यावर खुद्द विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरेगावच्या मेळाव्यात बोट ठेवले. त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी आपण कमी पडलो. सातारा, वडूज, पाटण, कऱ्हाड अशा ठिकाणी आपण कमी पडलो; पण या अपयशाने खचून जायचे नाही आणि यशाचा उन्माद करायचा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद जिल्ह्यात कमी होत असल्याचे स्पष्ट असून, विरोधी भाजपने आतून बालेकिल्ला पोखरल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आताच यावर इलाज झाला नाही, तर भाजप व शिंदे गट शिवसेना संधी साधू शकते. त्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांनी या सर्व परिस्थितीत लक्ष घालून जिल्ह्यातील नेत्यांचे कान धरणे आवश्यक आहे.

Bazar Samiti election Sharad Pawar NCP Shashikant Shinde
Karnataka Election Result : कर्नाटकात भाजपचा सुपडासाफ; 'ही' आठवण काढत डीकेंना कोसळलं रडू

जिल्ह्यात पक्षाची वज्रमूठ तयार करणे आवश्यक

प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात व्यस्त असल्याने राष्ट्रवादीची एकजूट कमी कमी होऊ लागली आहे. बालेकिल्ल्यावरील राष्ट्रवादीची ढिली होत चाललेली पकड पुन्हा घट्ट होण्यासाठी शरद पवार यांनी लक्ष घालून जिल्ह्यात पक्षाची वज्रमूठ तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी शरद पवारांनी लक्ष घालून पक्षांतर्गत वाद व नेत्यांतील अंतर्गत दुही दूर करणे आवश्यक आहे. तरच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची एकजूट निर्माण होऊन यश मिळणार आहे. अन्यथा भाजप व शिंदेंची शिवसेना जिल्हा परिषदेत शिरकाव करण्यासही मागे पुढे पाहणार नाही.

Bazar Samiti election Sharad Pawar NCP Shashikant Shinde
Karnataka Result : कर्नाटकात बड्या नेत्यांचा पराभव, प्रमुख नेत्यांनी मारली बाजी; जाणून घ्या कोण विजयी, कोण पराभूत?

आगामी निवडणुकांत हवी एकजूट

नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत कोरेगावात राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवली. त्यामुळे या बाजार समितीत राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली. त्यासाठी शशिकांत शिंदे यांना माजी सभापती रामराजेंची साथ मिळाली, तसेच पदाधिकारी व कार्यकर्तेही एकसंध राहिले. कोरेगाव बाजार समितीतील ही एकजूट जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत दिसल्यास राष्ट्रवादीला कोणतीच निवडणूक अवघड जाणार नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.