NCP Crisis : राष्ट्रवादीत उभी फूट; अजितदादांची ताकद भाजपच्या पथ्यावर? थोरल्या पवारांचा 'हा' गड अभेद्य!

कऱ्हाड उत्तरमधील राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी हे शरद पवार यांच्यासोबत आहेत.
MLA Balasaheb Patil support to Sharad Pawar
MLA Balasaheb Patil support to Sharad Pawaresakal
Updated on
Summary

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर कऱ्हाड उत्तर मतदारसंघाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा कऱ्हाड उत्तर हा मतदारसंघ. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून घडाळ्याचे काटे योग्य दिशेने फिरवून विरोधकांचे बारा वाजवत ज्येष्ठ नेते (कै.) पी. डी. पाटील, आमदार बाळासाहेब पाटील यांनी ही गड अभेद्य राखला.

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वतंत्र गटांची विधानसभा मतदारसंघात विभागणी सुरू झाली आहे. मात्र, आमदार पाटील हे शरद पवार यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत. त्यामुळे कऱ्हाड उत्तरमधील राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी हे शरद पवार यांच्यासोबत आहेत.

MLA Balasaheb Patil support to Sharad Pawar
Ratnagiri Politics : ठाकरे सेनेचा 'हा' निष्ठावंत शिलेदार रत्नागिरीतून रिंगणात? भास्कर जाधवांना लोकसभेची ऑफर

मात्र, अजित पवारांची ताकद भाजपच्या पथ्यावर पडेल, या आशेतून पाळेमुळे घट्ट करत या मतदारसंघावर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप हातघाईवर आली आहे. त्याला कितपत यश येईल, हे येणारा काळच ठरवेल. कऱ्हाड उत्तर मतदारसंघात सातारा, खटाव, कोरेगाव आणि कऱ्हाड तालुक्यांतील गावांचा समावेश होतो. त्यामुळे या मतदारसंघाचे कार्यक्षेत्र हे चार तालुक्यांचे आहे.

या मतदारसंघावर राष्ट्रवादीचे स्थापनेपासून आजअखेर वर्चस्व आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील आणि सध्या आमदार बाळासाहेब पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत. या सर्व मतदारसंघातील गावामध्ये संपर्क वाढण्याचे कारण सह्याद्री सहकारी साखर कारखाना आहे.

MLA Balasaheb Patil support to Sharad Pawar
NCP Crisis : अजितदादा गटाच्या लवकरच होणार पदाधिकारी निवडी; रामराजेंवर मोठी जबाबदारी

कारखान्याचे कार्यक्षेत्र हे संबंधित तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात आहे. त्यामुळे कारखान्याच्या माध्यमातून या मतदारसंघातील गावात आमदार पाटील यांचा संपर्क आहे. त्यामुळे त्यांची मतदारसंघातील पाळेमुळे घट्ट आहेत. या मतदारसंघात मागील निवडणुकीत सध्या भाजपमध्ये असलेले धैर्यशील कदम, मनोज घोरपडे यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या मतांची विभागणी होऊन तेथे आमदार पाटील हे विजयी झाले.

MLA Balasaheb Patil support to Sharad Pawar
NCP Crisis : राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार सोलापूर दौऱ्यावर? 'त्या' तीन आमदारांविरुध्द आखणार रणनीती

त्यानंतरपासून आजअखेर भाजपकडून त्या मतदारसंघात वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या मतदारसंघातील विकासकामांत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ यांनी राज्यातील युती सरकारमधील मंत्र्यांकडून निधी आणून त्याद्वारे गावोगावी भाजपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसमवेत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडून पक्ष दुभंगला. त्याचा परिणाम विधानसभा मतदारसंघावर होऊ लागला आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये आमदार पाटील हे शरद पवार यांच्याबरोबर आहेत.

MLA Balasaheb Patil support to Sharad Pawar
NCP Crisis : साहेबांचीच पाॅवर! राज्यातला 'हा' एकमेव मतदारसंघ, जिथं अजितदादांच्या गटाचा एकही पदाधिकारी नाही!

अजित पवार पक्षातून बाहेर गेल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेण्यापूर्वीचे आमदार पाटील यांनी कऱ्हाडमध्ये पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांचे जे धोरण तेच माझे धोरण असे जाहीर करून त्यांच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे कऱ्हाड उत्तरेतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते शरद पवार यांच्याबरोबर आहेत.

जिल्हाध्यक्ष सुनील माने हे शरद पवार यांच्या दौऱ्यात अनुपस्थित होते. मात्र, त्यांनी खासदार पवार यांच्याबरोबरच असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सध्यातरी कऱ्हाड उत्तरमध्ये शरद पवार गटाला अडचण नाही. मात्र, अजित पवार यांची ताकद भाजपच्या पथ्यावर पडेल, या आशेने भाजपचे नेते चार्ज झाले आहेत. अजित पवारांना मानणारा कऱ्हाड उत्तरमधील नेता, पदाधिकारी सध्यातरी समोर आलेला नाही. त्यामुळे त्यांची मतदारसंघात किती ताकद आहे, हे सांगणे मुश्‍कील आहे.

MLA Balasaheb Patil support to Sharad Pawar
NCP Crisis : तब्बल 40 वर्ष ऋणानुबंध; पाटणकरांचा पराभव झाला, तरी पवारांचं प्रेम कमी झालं नाही, हा इतिहास आहे!

दादा गटाची पाटी कोरी...

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर कऱ्हाड उत्तर मतदारसंघाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याने त्या पक्षातील कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी कोणत्या गटाकडे जाणार? याची मोठी उत्सुकता होती. मात्र आमदार बाळासाहेब पाटील यांनी शरद पवारांसोबत असल्याचे जाहीर केले.

त्यामुळे आता अजित पवार यांच्या गटात कोण? याची उत्सुकता आहे. अजित पवार यांनी शपथ घेऊन आठवडा झाला, तरीही सध्या एकाही पदाधिकारी, नेत्याने अजित पवारांसोबत असल्याचे जाहीर केले नाही. त्यामुळे सध्यातरी कऱ्हाड उत्तरमधील दादा गटाची पाटी कोरीच दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.