Uniform Civil Code : समान नागरी कायद्यातून RSS विचारांचा अजेंडा; NCP नेते म्हणाले, कायद्याला आमचा विरोध..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या संविधानामुळे मुळातच सर्व समान आहेत.
Uniform Civil Code
Uniform Civil Codeesakal
Updated on
Summary

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्वांना समान वागणूक दिली आहे. समान अधिकार दिले आहेत.

सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या संविधानामुळे मुळातच सर्व समान आहेत, असे असताना आरएसएसच्या विचारातूनच समान नागरी कायदा होऊ घातला आहे. या कायद्याला आमचा विरोध नाही; परंतु ज्या पद्धतीने पुढे आणला जात आहे.

त्यावरून हा कायदा (Uniform Civil Code) संघाच्या विचारप्रणालीचा (RSS) एक अजेंडा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष, माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी केला आहे. दरम्यान, सातारा येथे मातंग आघाडीची पश्चिम महाराष्ट्र समाज परिषद येत्या सोमवारी (तीन जुलै) दुपारी एक वाजता होणार आल्याचे त्यांनी सांगितले.

Uniform Civil Code
Karwar : पत्नी, मुलाला नदीत ढकलून व्यावसायिकानं स्वत: लावून घेतला गळफास; घटनेने कारवारात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. गायकवाड यांनी ही माहिती दिली. या वेळी जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे, प्रदेश उपाध्यक्ष पंडित कांबळे आदी उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, ‘‘ गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक विरोध करण्याचा अजेंडा राबवण्यात येतो आहे.

त्याचाच परिपाक म्हणजे समान नागरी कायदा आहे. या कायद्याला आमचा विरोध नाही; परंतु ज्याप्रकारे हा कायदा आणला जातोय त्याला विरोध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्वांना समान वागणूक दिली आहे. समान अधिकार दिले आहेत. त्यामुळे समान नागरी कायद्याची आता तर गरज नाही.’’

Uniform Civil Code
Indian Jawan : सुटीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला; थांबलेल्या ट्रकच्या धडकेत जवान जागीच ठार

भाजपकडून जी धोरणे राबवली जात आहेत. ती चुकीची आहेत, असा आरोप त्यांनी केला. श्री. गायकवाड म्हणाले, ‘‘सातारा तालुक्यातील कोंडवे येथील अनंतराज मल्टिपर्पज हॉल येथे पश्चिम महाराष्ट्रातील विभागीय मातंग परिषद तीन जुलैला होणार आहे. या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.

Uniform Civil Code
Bus Accident : मुलाला महाविद्यालयात सोडून परतताना काळाचा घाला; बस दुर्घटनेत गंगावणे कुटुंब होरपळले

त्याचबरोबर खासदार श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक -निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, संजय बनसोडे, दीपक चव्हाण, बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.