हिम्मत असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवा

फलटणचे नगरसेवक पांडुरंग गुंजवटेंचे नगरसेवक अशोक जाधव यांना आव्हान
NCP-BJP
NCP-BJPesakal
Updated on
Summary

भाजपचे नगरसेवक जाधव व राष्ट्रवादीचे नगरसेवक गुंजवटे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे.

फलटण शहर (सातारा) : नगरसेवक अशोक जाधव यांनी आपले नाव बदलून ‘अशोक सेटलमेंट’ असे ठेवावे. आगामी निवडणूक (Election) आपण त्यांच्या प्रभागातूनच लढवून ती जिंकणारच आहे. हिम्मत असेल तर त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान ज्येष्ठ नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांना दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे (BJP) नगरसेवक अशोकराव जाधव व राष्ट्रवादीचे (NCP) नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. गुंजवटे बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची उपस्थिती होती. त्यांच्यावर टीका केली तर मला तिकीट मिळेल, या अविर्भावात अशोक जाधव असतील तर सर्वप्रथम त्यांनी आपली पत तपासावी, असे स्पष्ट करून श्री. गुंजवटे म्हणाले, ‘‘माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यापूर्वी त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे. स्वतःला एकीकडे हभप म्हणून मिरवायचे व दुसरीकडे चिकन सेंटरचे उद्‌घाटन करायचे हे कसे काय? याचा उलगडा झाला पाहिजे.

NCP-BJP
निवडणुकीत राष्ट्रवादी मारणार विजयी षटकार? शिवसेनेकडून 'टाइट फिल्डिंग'

विकासकामांच्या तक्रारी करून व सेटलमेंट करून मुलाला ‘सप्लाय टेंडर’ मिळवायचे, हा धंदा असणाऱ्या जाधव यांना माझ्यावर आरोप करण्याचा अधिकार नाही. विधान परिषदेच्या एका निवडणुकीत त्यांनी माझ्या घरी येऊन हजारो रुपये घेतल्याचा गौप्यस्फोटही श्री. गुंजवटे यांनी पत्रकार परिषदेत केला. मलठण येथील पोलिस चौकीबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘चौकीची जागा ठरवणारे तुम्ही आम्ही कोण? पोलिस प्रशासनास जी जागा योग्य वाटेल, तेथे नगरपालिका त्यांना जागा उपलब्ध करून देईल.’’

NCP-BJP
ED काय, ईडीच्या बापालाही आम्ही घाबरत नाही; NCP आमदाराचा थेट इशारा

जाधवांची कॅसेट निवडणुकीत वाजवणार

अशोक जाधव यांनी ‘आबा तुम्हीच माझे नेते आहात,’ असे मान्य केले आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत गजानन चौकात याबाबतची कॅसेट आपण जनतेपुढे वाजवून दाखविणार असल्याचेही पांडुरंग गुंजवटे यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.