Koregaon : मस्तीचा बैल चालत नसतो, त्याला वेसण..; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा कोणाला इशारा?

मी लढायला तयार आहे. कार्यकर्त्यांनो तुमची तयारी ठेवा.
Shashikant Shinde News
Shashikant Shinde Newsesakal
Updated on
Summary

बाजार समितीच्या निवडणुकीत आपल्यामध्ये कधी फूट पडतेय, याकडे लक्ष ठेवून आपल्यातील दुहीचा फायदा उठविण्याचे विरोधकांचे मनसुबे होते.

पळशी : ‘आमचे महाराष्ट्रामध्ये ४५ खासदार निवडून येणार,’ असे केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे नेते अमित शहा म्हणतात, मग शिंदे गटाच्या विद्यमान १४ खासदारांचे काय, त्यांनी तिकडे जाऊन काय साध्य केले, असा टोला खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांनी लगावला.

कोरेगाव बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मिळवलेल्या विजयाचा डंका कोरेगाव मतदारसंघामध्ये येणाऱ्या निवडणुकीतही वाजवा, असे आवाहन त्यांनी केले. शिरढोण (ता. कोरेगाव) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन, उद्‍घाटन आणि शिरढोणचे नेते व बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती जयवंत घोरपडे यांच्यासह उपसभापती, संचालकांच्या सत्कार कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात खासदार पाटील बोलत होते.

याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), बाळासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, बाळासाहेब सोळस्कर, शिवाजीराव महाडिक, कांतिलाल पाटील, राजाभाऊ जगदाळे, शहाजी क्षीरसागर, जयवंतराव भोसले, शाहूराज फाळके, भास्कर कदम, अजित भोईटे, अजय कदम, नाना भिलारे, काकासाहेब गायकवाड, बजरंग पवार, दिलीप अहिरेकर, ॲड. दीपक शिंदे, पांडुरंग भोसले, सचिन बर्गे, सचिन साळुंखे, ललित मुळीक, श्रीमंत नि. झांजुर्णे.

Shashikant Shinde News
Kolhapur Riots : कोल्हापुरात दंगल घडली की घडवली गेली; रोहित पवारांच्या मनात वेगळाच संशय

तसेच तानाजीराव मदने, श्रीमंत स. झांजुर्णे, राजेंद्र भोसले, संजय झंवर, नरसिंग दिसले, संभाजीराव साळवे, संजय कदम, राहुल निकम, संजय फाळके, अधिक माने, बापूराव चव्हाण, संजना जगदाळे, वैशाली भोसले, सुप्रिया सावंत, गीतांजली पवार, सचिन घोरपडे, विजयराव घोरपडे, मदन घोरपडे, श्रीकांत घोरपडे, गजानन बर्गे, दिलीप कदम, अजित कदम, अजित घोरपडे, अतुल घोरपडे उपस्थित होते.

Shashikant Shinde News
Kolhapur Riots : कोल्हापूर दंगलीनंतर पहिल्यांदाच बोलले मुश्रीफ; म्हणाले, औरंगजेब मुसलमानांचा..

शिरढोणचे सुपुत्र जयवंत घोरपडे यांना बाजार समितीच्या सभापतिपदाची संधी मिळाली आहे, आता त्यांनी भूषणावह काम करावे, असे खासदार पाटील यांनी सांगितले. आमदार शिंदे म्हणाले, 'बाजार समितीच्या निवडणुकीत आपल्यामध्ये कधी फूट पडतेय, याकडे लक्ष ठेवून आपल्यातील दुहीचा फायदा उठविण्याचे विरोधकांचे मनसुबे होते; परंतु त्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. एकीच्या जोरावर आपण ही निवडणूक जिंकलो. जयवंत घोरपडे यांना निष्ठेचे फळ मिळाले आहे.'

Shashikant Shinde News
Monsoon Update : मॉन्सून कारवारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी धडकणार? जाणून घ्या महत्वाची अपडेट

'कोरेगाव मतदारसंघात शिरढोणसह मी २० बंधारे मंजूर करून आणले. ही कामे थांबवण्याचा प्रयत्न विद्यमान आमदार करत होते. मला नारळ फोडे म्हणणारे नंतर ते स्वतःच या कामांचे नारळ फोडायला गेले. गावाच्या प्रवेशद्वारावर अथवा गावात सिमेंटचा रस्ता करायचा, एवढेच त्यांचे काम आहे आणि त्यातही त्यांची पार्टनरशिप आहे. मस्तीचा बैल चालत नसतो, त्याला वेसण घालण्याचे काम करू. मी लढायला तयार आहे. कार्यकर्त्यांनो तुमची तयारी ठेवा.' आमदार पाटील, श्री. सोळसकर, जयवंत घोरपडे, विक्रम घोरपडे यांची भाषणे झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.