शरद पवारांच्या उपस्थितीत साताऱ्यात 17 एप्रिलला राष्ट्रवादीची संवाद यात्रा

NCP
NCPesakal
Updated on
Summary

यात्रेच्या सांगता सभेस खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

सातारा : साताऱ्यात १७ एप्रिलला होणाऱ्या राष्ट्रवादीच्या (NCP) संवाद यात्रेत सर्वांनी सहभागी होऊन यात्रा यशस्वी करावी. कोल्हापूर येथे होणाऱ्या यात्रेच्या सांगता सभेस अध्यक्ष, खासदार शरद पवार (Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), तसेच पक्षाचे सर्व नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. सातारा जिल्ह्यातून २५ हजार कार्यकर्ते कोल्हापूरच्या सांगता सभेस उपस्थित राहतील, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा १७ एप्रिलला साताऱ्यात येत आहे. ता. २३ एप्रिल रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या परिवार संवाद यात्रेच्या सांगता कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी भवनात आज जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, बाळासाहेब सोळसकर, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, पक्षाचे सर्व सेलचे अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

NCP
आंध्रात 13 नव्या जिल्ह्यांचा उदय; जगन मोहन रेड्डी सरकारचा मोठा निर्णय

रामराजे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद यात्रा संपूर्ण राज्यातील २५५ विधानसभा मतदारसंघ व ३५ जिल्ह्यांत फिरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. जिल्ह्यात १७ व १८ एप्रिल रोजी चार विधानसभा मतदारसंघांत होणाऱ्या परिवार संवाद यात्रेचे जल्लोषात स्वागत करावे. शनिवारी (२३ एप्रिलला) सायंकाळी पाच वाजता गांधी मैदान कोल्हापूर येथे सांगता सभा होणार आहे. या सभेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, तसेच नेते उपस्थित राहणार आहेत. सातारा जिल्ह्यातून साधारणतः २५ हजार कार्यकर्ते कोल्हापूर येथे उपस्थित राहणार आहेत.’’

NCP
नोकरीचा राजीनामा देऊन IPS अधिकाऱ्याचा केजरीवालांच्या 'आप' पक्षात प्रवेश

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यात यात्रेचे जंगी स्वागत करावे, चार मतदारसंघांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या वेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, मानसिंगराव जगदाळे, बाळासाहेब सोळसकर, मंगेश धुमाळ, सतीश चव्हाण, बाळासाहेब सावंत, युवराज सूर्यवंशी, देवराज पाटील, संतोष पाटील, समिंद्रा जाधव, पूजा काळे, संगीता साळुंखे, वैभव कळसे, शफीक शेख, राजेंद्र लावंघरे, अतुल शिंदे, गोरखनाथ नलवडे, राजेंद्र राजपुरे, मिलिंद नेवसे, सागर कांबळे, सचिन कुऱ्हाडे, नंदकुमार मोरे, संतोष कणसे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.