आमदार पाटलांचेच शिलेदार ठरले 'लोणंद'चे कारभारी; पंचायतीवर NCP ची सत्ता

लोणंदच्या नगराध्यक्षपदी मधुमती पलंगे; उपनगराध्यक्षपदी शिवाजीराव शंकरराव शेळके-पाटील यांची निवड
Lonand Nagar Panchayat
Lonand Nagar Panchayatesakal
Updated on
Summary

काँग्रेस-भाजप आघाडीच्या शेळकेंच्या बाजूने सात मते पडल्याने शेळके-पाटील हे १० विरुद्ध ७ मतांनी विजयी झाले.

लोणंद (सातारा) : लोणंद नगरपंचायतीच्या (Lonand Nagar Panchayat) नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मधुमती सागर पलंगे (गालिंदे) व उपनगराध्यक्षपदी शिवाजीराव शंकरराव शेळके- पाटील यांची निवड झाली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी दिली.

नगरपंचायतीच्या सभागृहात काल नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीसाठी नवनिर्वाचित सर्व १७ सदस्य उपस्थित होते. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मधुमती पलंगे (गालिंदे) यांना दहा, तर काँग्रेसच्या (Congress) दीपाली नीलेश शेळके यांना सात मते पडल्याने पलंगे या १० विरुद्ध सात मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. पलंगे यांच्या बाजूने राष्ट्रवादीच्या शिवाजीराव शेळके - पाटील, भरतसाहेब शेळके, सचिन शेळके, रवींद्र क्षीरसागर, गणीभाई कच्छी, भरत बोडरे, सुप्रिया शेळके, सीमा खरात, रशिदा इनामदार आदी दहा नगरसेवकांनी हात उंचावून मतदान केले. काँग्रेसच्या दीपाली शेळके यांच्या बाजूने काँग्रेसचे आसिया बागवान, प्रवीण व्हावळ, भाजपच्या दीपाली संदीप शेळके, तृप्ती घाडगे, ज्योती डोणीकर, तर अपक्ष राजश्री शेळके आदी सात नगरसेवकांनी मतदान केले. उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजीराव शेळके- पाटील व भाजपच्या वतीने दीपाली शेळके यांनी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीचे शिवाजीराव शेळके यांच्या बाजूने दहा, तर काँग्रेस- भाजप आघाडीच्या भाजपच्या दीपाली शेळके यांच्या बाजूने सात मते पडल्याने शिवाजीराव शेळके- पाटील हे १० विरुद्ध ७ मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. शिवाजीराव शेळके यांना राष्ट्रवादीच्या दहा नगरसेवकांनी, तर भाजपच्या दीपाली संदीप शेळके यांना भाजपच्या तीन, काँग्रेसच्या तीन व एक अपक्ष आदी ७ नगरसेवकांनी मतदान केले.

Lonand Nagar Panchayat
उत्तर प्रदेशात EVM बिघडलं; 'सपा'ची निवडणूक आयोगाकडं धाव

या निवडीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव जगताप व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आमदार मकरंद पाटील यांनीही नगरपंचायतीच्या सभागृहात उपस्थित राहून नूतन नगराध्यक्ष पलंगे- गालिंदे व व उपनगराध्यक्ष शेळके -पाटील यांचा सत्कार करून त्यांच्या दालनात जाऊन त्यांच्याकडे पदभार सुपूर्त केला. त्यांना शुभेच्छा दिल्या. या निवडीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. या निवडीबद्दल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, मिलिंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, जिल्हा कोविड समन्वय समितीचे सदस्य डॉ. नितीन सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद खरात, लोणंद शहराध्यक्ष विनोद क्षीरसागर, सागर शेळके, अॅड. गजेंद्र मुसळे, हणमंतराव शेळके, प्रा. सुनील शेळके, रमेश शेळके, भिकूदादा कुर्णे, बबलू इनामदार, शफीभाई इनामदार आदींनी अभिनंदन केले.

Lonand Nagar Panchayat
मुरादाबादमध्ये आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना; पुतळ्यावर ओतली काळी शाई

सव्वा सव्वा वर्षाचा फॉर्म्युला

अडीच वर्षांच्या कालावधीत पक्षांतर्गत ठरावानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठी नगराध्यक्षपदी मधुमती पलंगे व उपनगराध्यक्षपदी शिवाजीराव शेळके- पाटील यांना संधी मिळाली आहे. सव्वा वर्षानंतर अन्य नगरसेवकांनाही या दोन्ही पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे, असे या वेळी आमदार मकरंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.