लक्ष्मण तात्यांच्या पुण्याईमुळेच नितीन पाटील यांना अध्यक्षपद मिळाले.
भिलार : लक्ष्मण तात्यांच्या पुण्याईमुळेच नितीन पाटील (Nitin Patil) यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळाले. नितीन काका, आता श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) म्हातारे झाले आहेत. पुढील खासदार तुम्हीच व्हायला हवे, असे वक्तव्य जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे (Vasantrao Mankumare) यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमधील (Nationalist Congress Party) अनेकांना धक्का बसलाय. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील (Satara District Bank Election) यशामुळं मानकुमरेंचा आत्मविश्वास दुणावलाय.
दत्तात्रय कळंबे महाराज (Dattatraya Kalambe Maharaj) हे जावळीतील राजकारण्यांचे प्रेरणास्थान होते. महाराजांचा पाठीवर पडलेला हात आणि आशीर्वाद मिळाला की तुमचे राजकारणातील यश निश्चित हाच जणू खाक्या बनला होता. महाराज आध्यात्मिक असले तरी त्यांचा सहकार, सामाजिक आणि राजकीय पगडा मोठा होता. परंतु कळंबे महाराजांच्या निर्वाणानंतर येथील नेतेमंडळी स्वयंभू झाली आणि सैरभैरही झाली. बेलोशी येथे कळंबे महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात जिल्हा बँकेच्या राजकारणाचे पडसाद उमटले. जणू राजकीय दंगलच या ठिकाणी पाहायला मिळाली. एका बाजूला वसंतराव मानकुमरे (Vasantrao Mankumare) निवडणूक बिनविरोध करण्याचा व्यासपीठावरून नारा करीत असताना दुसरीकडे मात्र आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी महाराजांच्या समाधीवर आपल्या सहकाऱ्यांसमवेत माथा टेकला आणि ‘जावळी’च्या आगामी संघर्षाचा जणू नारळच या ठिकाणी फोडला.
दरवर्षी कळंबे महाराजांच्या समाधी स्थळावर अध्यात्मिक दृष्ट्या सजग कार्यक्रम होतो. मात्र, जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील यशामुळे वसंतराव मानकुमरे यांचा आत्मविश्वास दुणावला. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्ष कार्यक्रमात खंड पडला होता. त्यामुळं वसंतराव मानकुमरे यांनी मोठ्याप्रमाणात कार्यक्रम करण्याचा घाट घातला. या वेळी त्यांनी भाषणात अनेक धक्कादायक वक्तव्य करून आगामी निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षाची चुणूक दाखवली. या वेळी मानकुमरे म्हणाले, आमदार मकरंद आबा पाटील यांनी महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुक्यातील जागा बिनविरोध निवडून आणल्या. लक्ष्मण तात्या यांची पुण्याई त्यामुळे नितीन काकांना अध्यक्षपद मिळाले. काका आता श्रीनिवास पाटील म्हातारे झाले आहेत. पुढील खासदार तुम्हीच व्हायला हवे. निमित्त पुण्यस्मरण सोहळ्याचे होते, परंतु या ठिकाणी राजकीय आखाडाच रंगला. त्यामुळे अनेकांना गुदगुल्या झाल्या. मात्र, दुसरीकडे वारकरी संप्रदायातील लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. एकूणच या कार्यक्रमानिमित्तानं जावळीच्या आगामी राजकारणाचं चित्र मात्र स्पष्ट झालंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.