अहिल्याबाईंचा वसा घेवून पुन्हा नव्या जोमात आपलं आयुष्य जगा : नीलम गोरे

कोरोना साथीत पती गमावलेल्या महिलांनी खचून न जाता अहिल्याबाई होळकरांचा वसा घेवून नव्याने पुन्हा त्याच जोमात आपले आयुष्य जगावे.
Neelam Gorhe statement Take Ahilyabai holkar inspiration and live your life in new vigor satara
Neelam Gorhe statement Take Ahilyabai holkar inspiration and live your life in new vigor satarasakal
Updated on

म्हसवड : कोरोना साथीत पती गमावलेल्या महिलांनी खचून न जाता अहिल्याबाई होळकरांचा वसा घेवून नव्याने पुन्हा त्याच जोमात आपले आयुष्य जगावे. असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केले. कोरोना साथीत पती गमावलेल्या माण व खटाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील महिलांना येथील माण देशी फाउंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चालू खरीप हंगामासाठी मोफत बाजरी,सोयाबीन मका व मुग बियाणांचे वाटप सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे माण देशी फाउंडेशन तर्फे करण्यात आले.

या कार्यक्रमात त्या ऑनलाईन उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन नीलम गोरे बोलत होत्या.यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह,कृषी उपसंचालक विजय कुमार राऊत, माण देशी फौंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा,उपविभागीय कृषी अधिकारी भास्करराव कोळेकर,माण तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, खटाव तालुका कृषी अधिकारी राहुल जितकर, माण तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण कोडलकर,माण देशी महिला सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रेखा कुलकर्णी,माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा,माण देशी किसान प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा सौ. वनिता पिसे इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

नीलम गोरे पुढे म्हणाल्या की,"तुम्हा महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करतेवेळी आपली जमीन सांभाळून त्यातुन नव्या उमेदीने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागणार आहे.आपल्या अडचणी सोडवण्यासाठी शासनातर्फे कशी जास्तीत जास्त मदत देता येईल यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्नशील आहोत.संबधित महिलांना आणखी कोण कोणती मदत करता येईल यासाठी मी स्वत: श्रीमती चेतना सिन्हा यांचे बरोबर वेळोवेळी चर्चा करीत असते. महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भविष्यात शाश्वत शेती विकसित करण्यासाठी माण देशी फौंडेशनच्या माध्यमाने श्रीमती चेतना सिन्हा या नेहमीच कार्यरत असतात.माण देशी फाउंडेशन हे महिलांचे जणू माहेरघरच असुन महिलासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.शेखर सिंह म्हणाले कोरोना साथीत आई - वडील दोन्ही पालक गमावलेल्या मुलांची संख्या 25 आहे.या मुलांना शिक्षण व पालकत्वाची जबाबदारी स्विकारणे खुपच गरजेचं आहे.

श्रीमती सिन्हा यांनी माण देशी फौंडेशनने कोरोना साथीत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमात कोरोना मुळे पतीचे निधन झालेल्या महिलांनीही कुटंबावर आलेल्या संकटाचा सामना कशा पध्दतीने करण्याची वेळ आली याची माहिती डोळ्यात डबडबत्या अश्रंनी कथीत केली.या कार्यक्रमात माण व खटाव तालुक्यातील 160 एकल महिलांना प्रत्येकी 25 किलो सोयाबीनच्या एकुण 40 बॅग,तीन किलो प्रमाणे एकुण 260 बॅग बाजरी, चार किलो प्रमाणे एकुण 130 बॅग मका,आणि एक किलो प्रमाणे एकुण 130 बॅग मुग बियाणे मोफत वाटप करण्यात आले.

बियाणे दिलीत त्याची पेरणी करा..

काढणी नंतर मी स्वत: तुम्हाला भेटायला पुन्हा येईन तुमच्याकडून एक चमचा उत्पादित माल प्रेमाने घेणार आहे. खचू नका धीराने परीस्थीतिला तोंड द्या यावेळी असेही आवाहन निलम गोरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.