आता कडुनिंब पळविणार कोरोनाला? कसे ते वाचा

आता कडुनिंब पळविणार कोरोनाला? कसे ते वाचा
Updated on

सातारा : कोरोना प्रतिबंधात्मक लस तयार करण्यासाठी देश-विदेशातील विविध संस्था कार्यरत आहेत. त्यात आता साताराही मागे राहिलेला नाही. देशातील पारंपरिक उपचारपद्धतीत महत्त्वाच्या असलेल्या कडुनिंबाचा त्यासाठी उपयोग केला जात आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या मदतीने फरिदाबादमधील ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये अडीचशे कोरोना योद्‌ध्यांवर देशातील अशा प्रकारची ही पहिलीच प्रतिबंधात्मक चाचणी सुरू झाली आहे. या चाचणीचे निष्कर्ष ऑक्‍टोबरपर्यंत हाती येणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचा
 
साताऱ्यातील निसर्ग बायोटेक या कंपनीने या चाचणीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठीच्या सर्व परवानग्या मिळविण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या (एआयआयए) माध्यमातून सात ऑगस्टपासून ही चाचणी प्रत्यक्षात सुरू झाली आहे. कोविड- 19 वर चाचणी करणारी ही पहिली भारतीय कंपनी आहे. फरिदाबाद येथील ईएसआयईसी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल फरिदाबाद येथे ही प्लासिबो नियंत्रित चाचणी सुरू आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या संचालक प्रो. डॉ. तनुजा नेसरी या प्रकल्पाच्या मुख्य संशोधक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली फरिदाबाद मेडिकल कॉलेजचे डिन डॉ. असीम सेन व रुग्णालयातील सहा डॉक्‍टरांची टीम ही चाचणी करत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येणारे कर्मचारी व नातेवाईक अशा 250 लोकांवर प्रोफेलेक्‍सिस विथ नीम कॅप्सुल या विषयाची चाचणी करण्यात येत आहे.

हजाराे गणेशभक्तांचा नारा, चलाे सातारा.. चलाे सातारा  

डबल ब्लाइंड पद्धत 

ही चाचणी डबल ब्लाइंड पद्धतीने केली जाणार आहे. म्हणजेच चाचणीसाठी निवडलेल्या 250 जणांपैकी 125 लोकांना 28 दिवसांसाठी "नीम कॅप्सूल' दिली जाणार आहे, तर 125 लोकांना प्लासिबो म्हणजेच मोकळ्या (औषधाविना) कॅप्सूल दिल्या जाणार आहेत. डबल ब्लाइंड पद्धतीत डॉक्‍टर अथवा पेशंट यापैकी कोणालाच कोणत्या कॅप्सूलमध्ये औषध आहे किंवा नाही हे समजत नाही. या पद्धतीने औषधाचे व त्याच्या परिणामाच्या मूल्यांकनावर कोणतेही पूर्वग्रह राहात नाहीत. 28 दिवसांनी परीक्षण करून नीम कॅप्सूलचे परिणाम पाहिले जाणार आहेत. 

कास पठारावरील रस्ता बंद होणार? मूठभर धनिकांच्या प्रयत्नांची चर्चा

कडुनिंबाचीच निवड का? 

  • कडुनिंब ही एक ज्ञात ऍन्टीवायरल वनस्पती आहे. 
  • ती ताप, हार्पेस विषाणूसारख्या विविध आजारांकरिता आयुर्वेदात वापरली जाते. 
  • कडुनिंबाचा पाला हा रक्‍त शुद्धीकरणायाठी वापरला जातो. 
  • प्री क्‍लिनिक्‍ल अभ्यासामध्ये ऍन्टीफ्लॅमेटरी, ऍन्टीवायरल आणि ऍन्टी ऑक्‍सिडंट, तसेच वायरल डॉकिंग (वायरसचे संक्रमण) न होणे हे दिसून आले आहे. 

निसर्ग बायोटेकने बनवलेल्या कडुनिंबाच्या प्रमाणित अर्काचे संशोधन अमेरिकेत युनिव्हर्सिटी ऑफ टेक्‍सास सॅन अंटोनिओ येथेही सध्या चालू आहे. आम्ही घेत असलेली चाचणी यशस्वी झाल्यास कोविडबरोबर जगताना नीम कॅप्सूल हा एक वाजवी पर्याय होऊ शकतो.

डॉ. मोहिनी बर्डे, वैद्यकीय संचालक, ईएसआयईसी मेडिकल कॉलेज, फरिदाबाद


कोविड - 19 वर बऱ्याच मोठ्या कंपन्या काम करत आहेत; पण निसर्ग बायोटेक ही पहिली कंपनी स्वखर्चाने ही चाचणी करत आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (एआईआईए) आधुनिक पद्धतीने संशोधन करणारी संस्था म्हणून ओळखली जाते. आमची नीम कॅप्सूल कोविड प्रतिबंधक असल्याचे सिद्ध होईल. त्यानंतर आम्ही हे प्रमाणित औषध म्हणून सादर करण्यासाठी व पुढील संशोधनासाठी धोरणात्मक निधी उभा करण्याचा प्रयत्न करू.

गिरीश सोमण (संस्थापक व संचालक निसर्ग बायोटेक प्रा. लि. सातारा)


Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.