सातारा : वैद्यकीय प्रवेशाची नीट परीक्षा उद्या रविवारी (ता. 13) होणार आहे. येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल या परीक्षेसाठी जिल्ह्याचे समन्वयक आहे. परीक्षेसाठी सुमारे सहा हजार विद्यार्थी 13 केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेता परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्याची माहिती प्राचार्य ए. के. सिंग यांनी दिली.
13 परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाय योजले आहेत. जिल्ह्यात पोदार इंटरनॅशनल स्कूल कऱ्हाड, कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कऱ्हाड, पोदार इंटरनॅशनल स्कूल सातारा, सुखात्मे स्कूल, लिंब सातारा, सी. एस. कॉलेज सातारा, केबीपी इंजिनिअरिंग कॉलेज सातारा, श्रीमंत अभयसिंहराजे टेक्निकल कॉलेज शेंद्रे, अरविंद गवळी इंजिनिअरिंग कॉलेज सातारा, डी. जी. कॉलेज, सातारा, छाबडा कॉलेज रायगाव, इनव्हर्सल स्कूल, सातारा, यशोदा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
तासवडे औद्योगिक वसाहतीमधील मुरूम उत्खनन कारवाई संशयाच्या भोवऱ्यात?
विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. प्रवेशद्वारावरच प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्कॅनिंग सुद्धा केले जाणार आहे. परीक्षा कक्षामध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट परीक्षार्थींना परीक्षा कक्षापर्यंत पोचणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी उपाययोजना केल्या आहेत. परीक्षार्थींना आपल्यासोबत प्रवेशपत्र, फोटो, तसेच ओळखीचा पुरावा सोबत आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कऱ्हाडमध्ये दोन केंद्रांवर 'नीट'साठी 720 विद्यार्थी
ओगलेवाडी (जि. सातारा) : कऱ्हाड येथील शासकीय तंत्रनिकेतन व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्या रविवारी (ता. 13) वैद्यकीय प्रवेशाची नीट परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे 720 विद्यार्थी या दोन्ही परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना केल्याची माहिती केंद्रप्रमुख व शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली.
परीक्षेदरम्यान सामाजिक अंतर पाळले जावे, यासाठी प्रत्येक वर्गात जास्तीत-जास्त 12 विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रात गर्दी होऊ नये, यासाठी त्यांना सकाळी 11 वाजल्यापासून चार गटांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशद्वारावरच प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्कॅनिंग सुद्धा केले जाणार आहे. परीक्षा कक्षामध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. नीट परीक्षार्थींना परीक्षा कक्षापर्यंत पोचणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी उपाययोजना केल्या आहेत.
परीक्षार्थींना आपल्यासोबत प्रवेशपत्र, फोटो, तसेच ओळखीचा पुरावा सोबत आणावा, असे आवाहन केंद्र संचालक प्रा. आनंद पेंढारकर यांनी केले आहे. परीक्षा संपल्यानंतर सामाजिक अंतर राखत विद्यार्थ्यांना केंद्राबाहेर पडण्यासाठीसुद्धा आराखडा तयार करण्यात आला आहे. वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या पटांगणात वाहनतळाच्या व्यवस्थेसाठी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील व प्राचार्य डॉ. केंगार यांनी सहकार्य केल्याची माहिती प्रा. पेंढारकर यांनी दिली.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.