नव महाबळेश्वर प्रकल्पाचे क्षेत्र जैवविविधतेने अती समृद्ध असणाऱ्या आणि ‘जागतिक हॉट स्पॉट’ असणाऱ्या पश्चिम घाटातील आहे.
-डॉ. मधुकर बाचूळकर
New Mahabaleshwar Project : नव महाबळेश्वर प्रकल्प उभारण्याचा घाट घातला जात आहे. या क्षेत्रामध्ये नद्यांची उगमस्थाने, नद्यांची पात्रे आणि धरणांची जलाशये आहेत. त्यामुळे नियोजित प्रकल्प क्षेत्राची निवड चुकीची आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक लोक भूमिहीन होण्याचा मोठा धोका आहे. प्रकल्प क्षेत्रातील वनक्षेत्रे व जैवविविधता नष्ट होईल. त्यामुळे या प्रकल्पाचा अट्टहास का, हा प्रश्न पडतो.