दोनशे कोटींच्या विकास आराखड्यात प्रतापगड किल्ल्याच्या संपूर्ण तटबंदीची दुरुस्ती होणार आहे.
सातारा : प्रतापगड किल्ल्याच्या (Pratapgad Fort Satara) संवर्धन व विकासासाठी दोनशे कोटींच्या आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यात दुरुस्ती करून नव्याने आराखडा करण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकताच दिली आहे. त्यानुसार काही सुधारणा करून हाच आराखडा बांधकाम विभागाकडून (Construction Department) वापर लागणार जाणार आहे. त्यादृष्टीने प्रतापगड किल्ल्याचे संवर्धन व डागडुजी केली जाणार आहे.
प्रतापगड विकासाचा आराखडा (Pratapgad Development Plan) बांधकाम विभागाने तयार केला आहे. आमदार मकरंद पाटील यांनी पाठपुरावा करून या आराखड्यास मंजुरी मिळवली आहे; पण निधीअभावी हे काम झालेले नव्हते. आता बांधकाम विभागाकडील दोनशे कोटींच्या या प्रस्तावास आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी मिळून निधी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
सध्या कबर परिसरात पर्यटन विभागाकडून विकासाची कामे सुरू आहेत. त्यासाठी दहा कोटींचा निधी त्यांच्याकडून खर्च केला जाणार आहे. यामध्ये या परिसरातील ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन पर्यटनाच्या दृष्टीने तेथे देखावे तयार केले जात आहेत, तर पुरातत्त्व विभागाकडून किल्ल्याच्या वरच्या भागात जुनी बांधकामे पूर्ववत करणे, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणांची दुरुस्ती करणे आदी कामे सुरू आहेत.
दोनशे कोटींच्या विकास आराखड्यात प्रतापगड किल्ल्याच्या संपूर्ण तटबंदीची दुरुस्ती होणार आहे. टेहळणीसाठी तटबंदीच्याकडेने पदपथ केला जाणार आहे, तसेच गडावरील दगडी पायऱ्यांची दुरुस्ती केली जाणार आहे, तसेच गडावरील राजसदरेची दुरुस्ती करून तेथे अँटिक स्ट्रक्चर उभे केले जाणार आहे, तसेच गडावरील चार तळ्यांची दुरुस्ती करून तेथील पाण्याचा वापर केला जाणार आहे, तसेच गडावर स्वच्छतागृहांची उभारणी केली जाणार आहे.
बांधकाम विभागाने नव्याने प्रतापगडापासून खाली जाणारा रस्ता दुरुस्ती व डांबरीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा रस्ता सात मीटरचा (दीड पदरी) होता, त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण केले जाणार आहे. हा प्रस्ताव सीआरएफमधून केला असून, तो केंद्रीय महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास प्रतापगडावर जाणारा रस्ता प्रशस्त व सुंदर होणार आहे.
प्रतापगडावर येणार पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्किंगची समस्या आहे. पुरेसे पार्किंग करण्यासाठी वन विभाग परवानगी देत नाही, त्यामुळे अडचण होते. वन विभागाने किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे. या आराखड्यात त्याचाही समावेश होण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा पर्यटकांतून व्यक्त होत आहे.
प्रतापगड किल्ल्याच्या डागडुजी व संवर्धनाचे काम सुरू आहे; पण पर्यटन, पुरातत्त्व व बांधकाम विभागात समन्वयाचा अभाव आहे. कोणत्यातरी एका विभागाकडून या दुरुस्तीचे काम झाल्यास ते लवकर होऊन अधिक चांगल्या प्रकारे काम होणार आहे. त्यासाठी बांधकाम विभागाने केलेल्या आराखड्यानुसार कामे सुरू होणे गरजेचे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता बांधकाम विभागाला त्यांच्याकडील आराखड्यानुसार कामास परवानगी देणे गरजेचे आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.