Satara News : युवा मतदारांची अधिकाधिक नोंदणी करा - सौरभ राव

आयुक्त सौरभ राव : जिल्हाधिकारी कार्यालयात पुनर्निरीक्षण कार्यक्रमाचा आढावा
युवा मतदारांची अधिकाधिक नोंदणी करा
युवा मतदारांची अधिकाधिक नोंदणी कराSakal
Updated on

Satara News: विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. विशेषत: नवयुवा मतदारांची अधिकाधिक प्रमाणात नोंदणी होण्याच्यादृष्टीने स्वीप कार्यक्रम, थेट महाविद्यालयांशी समन्वय आदी नावीन्यपूर्ण कल्पनांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपायुक्त पुरवठा तथा सहायक मतदार यादी निरीक्षक समीक्षा चंद्राकार,

उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, प्रांताधिकारी सचिन ढोले, सुधाकर भोसले, राजेंद्रकुमार जाधव, उज्ज्वला गाडेकर, अतुल म्हेत्रे, सुनील गाडे, उपमुख्य निवडणूक अधिकारी अर्चना वाघमळे उपस्थित होत्या.

युवा मतदारांची अधिकाधिक नोंदणी करा
Satara : ठेकेदाराने खड्डे बुजविले; पण अर्धवटच!

श्री. राव म्हणाले, ‘‘मतदान प्रक्रियेत १८ ते १९ आणि २० ते २९ या वयोगटातील युवकांचा सहभाग वाढण्याकडे लक्ष द्या. त्यासाठी महाविद्यालयांशी समन्वय साधून अर्ज नमुना सहा भरून घेणे, संबंधित मतदारसंघाकडे पाठविण्यावर काम करा.

मतदार यादीतील दुबार व मयत, नावे, पत्ता व छायाचित्रे समान असलेली नावे कमी करणे, मतदार यादीतील तपशिलातील दुरुस्ती करण्याची प्रक्रिया संपूर्ण दक्षता घेऊन राबवावी. मतदार यादीत समाजातील सर्व घटकांचा समावेश होईल, याकडे लक्ष द्यावे.’’

युवा मतदारांची अधिकाधिक नोंदणी करा
Satara : मराठा विद्यार्थ्यांच्या खात्यावर साडेपाच कोटी ; ‘सारथी’ची कार्यवाही

श्री. डुडी म्हणाले, ‘‘जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपर्यंत १६ हजारांवर तर आजपर्यंत सुमारे २० हजारांपर्यंत युवा मतदारांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी नावीन्यपूर्ण कल्पनांचा अवलंब केला असून, पाटण मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यात पुनर्वसनाने स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही केली.’’

प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचे सहकार्य घ्या

जिल्ह्याला क्रीडा संस्कृतीची मोठी परंपरा आहे. महाबळेश्वर, पाचगणीसारख्या ठिकाणी चित्रपटसृष्टीतील मोठे कलावंत येतात. कलावंत, सेलिब्रिटी, प्रसिद्ध खेळाडू यांच्याकडून मतदार नोंदणी आवाहनाचे संदेश घेऊन ते व्हॉट्सॲप, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आदी समाजमाध्यमांद्वारे व्यापक प्रमाणात प्रसारित करावेत. मतदार जागृतीसाठी ‘डिस्ट्रिक्ट ॲम्बेसिडर, ‘यूथ आयकॉन’ नेमण्याचे आवाहन सौरव राव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.