Satara : 'तुम्हाला उडवून देऊ'; हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना उर्दू-मराठीत धमकीचे मेसेज

हिंदुत्ववादी संघटनांच्या पाच कार्यकर्त्यांना धमकीचे मेसेज आले.
Satara Police Station
Satara Police Stationesakal
Updated on
Summary

‘तुमचे काम थांबवा, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ,’ असा उर्दू व मराठीमध्ये मेसेज या कार्यकर्त्यांना आला आहे.

सातारा : स्वातंत्र्यदिनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित करणाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांना धमकीचे मेसेज आले आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात जमले होते.

Satara Police Station
Ashok Chavan : कोल्हापूर-मुंबईत दहा बैठका घेतल्या, तरीही मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही; असं का म्हणाले माजी मुख्यमंत्री?

स्वातंत्र्यदिनी एका अल्पवयीन मुलाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट प्रसारित झाली होती. संबंधित युवकाच्या स्टेटसवरही ती पोस्ट होती.

या प्रकाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Association) मोठ्या संख्येने जमत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको केला होता. त्याचबरोबर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाही संबंधितावर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते. या प्रकारामुळे काल शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Satara Police Station
Instagram वर छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; साताऱ्यात तणाव, हिंदुत्ववादी संघटनांकडून तोडफोड

पालकमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, यासंदर्भात आज कोरेगावमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा निघाला होता. या सर्व प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण असतानाच रात्री हिंदुत्ववादी संघटनांच्या पाच कार्यकर्त्यांना धमकीचे मेसेज आले. हे सर्व कार्यकर्ते काल आंदोलनामध्ये होते.

‘तुमचे काम थांबवा, अन्यथा तुम्हाला उडवून देऊ,’ असा उर्दू व मराठीमध्ये मेसेज या कार्यकर्त्यांना आला आहे. त्यामुळे याबाबत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात जमा झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()