कुडाळ - आषाढी एकादशीच्या निमित्ताने जावळी तालुक्यातील प्रतिपंढरपूर करहरमध्ये वैष्णवांचा मेळा भरतो. लाखो भाविक विठ्ठल नामाच्या जयघोष करत करहर नगरीमध्ये येतात यातच सातारा जिल्ह्यातील सध्याचे राजकीय विरोधक आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आज विठ्ठलाची पूजा करण्यासाठी जावळीत एकत्र दिसले.
दोन वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीपासून आमदार शशिकांत शिंदे आमदार शिवेंद्रसिंहराजे या दोन्हीही नेत्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली होती. आणि दोन्हीही नेते राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या विचारांचे झाले. तेव्हापासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीपर्यंत व त्यानंतर जावळी तालुक्यातल्या सोसायटीच्या निवडणुकीपर्यंत दोन्हीही नेत्यांच्या कार्यकर्ते व गटामध्ये चांगलेच कलगीतुरे जिल्ह्याच्या राजकारणात दिसून आले. कधीतरी चुकून लग्न सोहळ्यात समोरासमोर येणारे शशिकांत शिंदे व शिवेंद्रराजे आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने करहर येथील विठ्ठल मंदिरामध्ये एकत्रित पूजा करण्यास आल्याने अखेर या दोन्ही राजकीय नेत्यांना पुजेच्या निमित्ताने का होईना विठ्ठलानेच एकत्र आणले असे चित्र आज करहर मध्ये दिसून आले.
राजकीय दृष्ट्या गेल्या दोन वर्षात या दोन्हीही नेत्यांच्या गटात चांगलाच संघर्ष पहावयास मिळाला, दोन्हीही नेत्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय डावपेच टाकण्यात कुठलाही कसूर केला नाही, यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवेंद्रराजे यांचं पारडं जड ठरलं, तर आमदार शिंदे यांना त्यांचा पराभव जिव्हारी लागला होता, प्रासंगिक कार्यक्रमात दोन्ही नेत्यांचा आमना सामना होतो तेव्हा नमस्कार चमत्कार होतच असतो.
या सर्व घटनांना पाहण्यासाठी दोन्हीही कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह व कुतहूल असतं, आमदार शिंदे व आमदार भोसले एकमेकांसमोर आल्यानंतर एकमेकांशी बोलतात का, कसे वागतात, या छोट्या-मोठ्या गोष्टीकडे देखील दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष असते व त्यावर राजकीय चर्चा चांगलीच दूरपर्यंत रंगते.
आता व्यासपीठावर एकमेकांच्या विरोधात बोलणारी दोन्हीही नेते आज जावळी तालुक्यातल्या विठ्ठल मंदिरात एकत्रित पूजा करताना दिसल्यानंतर व एकमेकांना नमस्कार व आषाढीच्या शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी पाहिल्यावर कार्यकर्ते मनोमनी म्हणत असतील बा विठ्ठला तुझ्या आशिर्वादाने जावळीत सगळ कस एकदम आोके मध्ये होऊ दे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.