'लग्न सोहळ्यासाठी आता फक्त 50 वऱ्हाडींनाच उपस्‍थित राहता येणार'

Wedding Ceremony
Wedding Ceremonyesakal
Updated on
Summary

ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्‍यासाठी राज्‍य शासनानं नवीन नियमावली जाहीर केलीय.

सातारा : ओमिक्रॉनचा (Omicron Virus) फैलाव रोखण्‍यासाठी राज्‍य शासनाने जाहीर केलेल्‍या नियमावलीची सातारा जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी शेखर सिंह (Shekhar Singh) यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. यानुसार यापुढील काळात विवाह सोहळ्यासाठी (Wedding Ceremony) फक्‍त ५० व्‍यक्‍तींना उपस्‍थित राहता येणार असून, उपस्‍थितीची ही मर्यादा राजकीय, धार्मिक कार्यक्रमांनाही लागू राहणार आहे.

Wedding Ceremony
सगळ्यांना पुरुन उरलोय अन् केंद्रापर्यंत पोचलोय : नारायण राणे

राज्‍यभरातील कोरोना बाधितांची (Coronavirus) संख्‍या वाढीस लागली असून, दिवसेंदिवस ओमिक्रॉन बाधितांच्‍या संख्‍येत देखील वाढ होत आहे. ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्‍यासाठी राज्‍य शासनाने काल नवीन नियमावली जाहीर केली आहे. यानुसार त्‍याबाबतचे आदेश सर्व जिल्‍हाधिकाऱ्यांना देण्‍यात आले आहेत. स्‍थानिक पातळीवरील परिस्‍थितीचा आढावा घेत निर्बंध लागू करण्‍यात येत असून, यानुसार जिल्ह्यातही त्‍याची अंमलबजावणी करण्‍यात येत आहे.

Wedding Ceremony
007.. नाम तो सुना होगा! उदयनराजेंच्या ताफ्यात किती गाड्या आहेत माहितीय?

नवीन नियमानुसार खुल्‍या, बंदिस्‍त जागेतील विवाह सोहळ्यांना ५० व्‍यक्‍तींनाच उपस्‍थित राहता येणार असून, धार्मिक, तसेच राजकीय कार्यक्रमांनाही तेवढ्याच व्‍यक्‍तींना उपस्‍थित राहता येणार आहे. अंत्‍यसंस्‍कारावेळी फक्‍त २० जणांना उपस्‍थित राहण्‍याचे बंधन घालण्‍यात आले आहे. कोरोनाचा फैलाव आणि बाधित सापडणाऱ्यांच्‍या प्रमाणाचा विचार करत प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्‍याबाबतचा निर्णय स्‍थानिक पातळीवर घेण्‍याचे आदेशही जिल्‍हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.