गृहराज्यमंत्र्यांनी काळजी व्यक्त करताच वाहनधारकांकडून 36 लाखांचा दंड वसूल

गृहराज्यमंत्र्यांनी काळजी व्यक्त करताच वाहनधारकांकडून 36 लाखांचा दंड वसूल
Updated on

मलकापूर (जि. सातारा) : पुणे- बंगळूर महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आल्याने शासकीय वरिष्ठ स्तरावर बैठक झाली. बैठकीत "ऑपरेशन सेफ्टी ऑन हायवे' ही मोहीम राबवण्याच्या सूचना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. त्याप्रमाणे वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या 12644 वाहनांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. संबंधितांना 36 लाख 56 हजार शंभर रुपयांचा दंड करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या अधिकारी अस्मिता पाटील यांनी दिली.
 
महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मंत्री देसाई यांच्या उपस्थितीत मुंबईत महामार्ग पोलिस विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक भूषणकुमार उपध्याय, महामार्ग पोलिस विभागाचे प्रमुख पोलिस अधीक्षक संजय जाधव, पोलिस अधीक्षक अजितकुमार बन्सल यांची बैठक झाली. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, महामार्ग पोलिसचे कऱ्हाड, भुईंज, सातारा जिल्हा वाहतूक विभाग व कऱ्हाड शहर वाहतूक विभाग यांचे अधिकारी व अंमलदार यांनी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली.

ग्रामपंचायत निवडणुक लढविणा-यांना सुटी दिवशीही अर्ज भरता येणार  

महामार्गावर मुख्यतः अवजड वाहने उजव्या बाजूने चालवत असल्याने वाहतुकीस अडथळा व अपघात होत आहेत. अशा लेन कटिंग करणारे 3226 वाहने, वेगमर्यादेचे उल्लंघन करणारे 872 वाहने, सिटबेल्ट न लावणारे 137 चालक, हेल्मेट न घलता वाहन चालविणारे 818 वाहनचालक व इतर वाहतुकीचे नियम न पाळणारे एकूण 12644 वाहनांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली. संबंधितांना 36 लाख 56 हजार 100 रुपयांचा दंड करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.