NCP च्या आमदार शिंदेंना चुकांच्या परिमार्जनाची संधी

Shashikant Shinde
Shashikant Shindeesakal
Updated on

कोरेगाव (सातारा) : तालुक्याच्या (Koregaon Taluka) उत्तर व दक्षिण भागांना जिल्हा बँकेत (Satara District Bank) केवळ संधीच मिळाली नाही, तर उपाध्यक्षपदही मिळाले. आता सोसायटी मतदारसंघातून विधानसभेच्या मतदारसंघातील कोरेगावच्या मध्य भागाला बँकेची उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी या भागातील राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निवडणुकीवेळी झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्याची पहिली संधी म्हणून कोरेगावच्या मध्य भागाला बँकेची उमेदवारी मिळवून देण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांचे राजकीय कसब पणाला लागणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar), पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांच्यासारख्या दिग्गजांच्या कोरेगाव तालुक्यावर असलेल्या प्रभावाची जाणीव ठेवण्याबरोबर कोरेगावच्या मध्य भागातील कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण करण्याची तसेच विरोधक म्हणून आमदार महेश शिंदे यांना थोपवण्याची, अशी तिहेरी कसरत बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांना करावी लागणार आहे.

Summary

बहुतांश सोसायट्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे बँकेसाठी राष्ट्रवादीतून सर्वाधिक इच्छुक आहेत.

विद्यमान संचालक व बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने हे सध्या सोसायटी मतदारसंघातून कोरेगावचे प्रतिनिधित्व करत असून, ते तालुक्याच्या दक्षिण भागातील आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्ये तालुक्याच्या उत्तर भागातील लालासाहेब शिंदे यांनी बँकेचे उपाध्यक्षपद भूषवले आहे. हे दोघेही राष्ट्रवादीचे असून, आगामी निवडणुकीसाठी या दोघांचीही नावे पुन्हा चर्चेत आहेत. आता सोसायटी मतदारसंघातून विधानसभेच्या मतदारसंघातील कोरेगावच्या मध्य भागाला बँकेची उमेदवारी मिळावी, अशी आग्रही मागणी या भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. तालुक्यामध्ये सोसायटी मतदारसंघात ९० मते असून, बहुतांश सोसायट्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. त्यामुळे बँकेसाठी राष्ट्रवादीतून सर्वाधिक इच्छुक आहेत. त्यामध्ये विद्यमान उपाध्यक्ष माने, माजी उपाध्यक्ष शिंदे यांच्याबरोबरच तालुक्याच्या मध्य भागातील शिवाजीराव महाडिक, भगवानराव जाधव, राजेंद्र भोसले, अरुण माने या इच्छुकांचा समावेश आहे. विद्यमान उपाध्यक्ष माने हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत.

Shashikant Shinde
मृगजळ बनून बाहेरून येणाऱ्यांच्या मागे धावू नका

नुकतेच ते नियोजन मंडळाचे सदस्य झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून तालुक्याच्या दक्षिण भागाला, तर माजी उपाध्यक्ष शिंदे यांच्या माध्यमातून गेल्या पंचवार्षिकमध्ये उत्तर भागाला संधी मिळाली आहे. विधानसभेच्या कोरेगाव मतदारसंघाचा विचार करता कोरेगावच्या मध्य भागाला गेल्या काही वर्षांत बँकेमध्ये संधी मिळाली नाही. नुकत्याच झालेल्या नियोजन मंडळाच्या नियुक्त्यांमध्ये खटाव व सातारा भागाला प्रतिनिधित्व मिळाले असून, कोरेगावच्या मध्य भागाला मात्र डावलले गेल्याची भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. विधानसभेच्या निवडणुकीवेळी झालेल्या चुकांची जाहीर कबुली आमदार शिंदे यांनी नुकतीच दिली आहे. परिणामी राष्ट्रवादीपासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांपैकी काही कार्यकर्ते पुन्हा पक्षात परतू लागले आहेत. त्यामुळे मागील चुकांचे परिमार्जन करण्याची संधी आमदार शिंदे यांना बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरेगावच्या मध्य भागाला बँकेमध्ये संधी द्यावी, असा दबाव या भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर टाकण्यात येत आहे.

Shashikant Shinde
चर्चा तर होणारच! जिल्हा बँकेचं राजकारण तापलं; BJP-NCP आमदार एकत्र?

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पक्षविरहित आघाडी करण्यावर राष्ट्रवादीचा भर आहे. मात्र, जिल्ह्यात शिवसेनेकडून व कोरेगाव मतदारसंघात आमदार महेश शिंदे यांच्याकडून प्रतिसाद कसा मिळेल, हे अद्याप स्पष्ट नाही. काही महिन्यांपूर्वी वाघोली येथील सोसायटीमधून शहाजी भोईटे यांच्या माध्यमातून आमदार महेश शिंदे यांनी स्वतःच्या नावावर ठराव करून घेण्याचा प्रयत्न केला होता; परंतु काही कारणास्तव हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. या पार्श्वभूमीवर विद्यमान आमदार म्हणून त्यांची बँकेच्या निवडणुकीत राजकीय अस्तित्वासाठी भूमिका राहणार, हे निश्चित आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या खालोखाल काँग्रेसच्या ताब्यातील सोसायट्यांची संख्या होती; परंतु आता राजकीय चित्र बदलल्याने आमदार महेश शिंदे यांच्याकडेदेखील कोरेगावच्या मध्य भागातील काही ठराविक सोसायट्या गेल्या आहेत.

Shashikant Shinde
पोस्टात पुन्हा मेगा भरती; ग्रामीण भागात 4200 हून अधिक जागा भरणार

त्यामुळे ते देखील बँकेच्या निवडणुकीत उमेदवार उतरवू शकतात. कोरेगावातील दोनपैकी एका सोसायटीतून सुनील खत्री, तर दुसऱ्या सोसायटीतून किरण बर्गे यांच्या नावाचे ठराव आहेत. या दोघांपैकी राष्ट्रवादीच्या विरोधात कोण उतरणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल. तालुक्यातील बहुतांश सोसायट्यांवर राष्ट्रवादीचे प्राबल्य असले, तरी उत्तर भागावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा, तर दक्षिण भागावर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा प्रभाव असून, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने देखील दक्षिण भागातीलच आहेत. याशिवाय माजी खासदार (कै.) लक्ष्मणराव पाटील यांना मानणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचे नेतृत्व नितीन पाटील करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोरेगावच्या मध्य भागातील कार्यकर्त्यांसाठी आमदार शशिकांत शिंदे यांना तिहेरी कसरत करावी लागणार आहे.

Shashikant Shinde
पश्चिम बंगालमध्ये ममतांचीच हवा; BJP आमदाराचा 'तृणमूल'मध्ये प्रवेश

शशिकांत शिंदे कोरेगावातूनही मतदार

आमदार शशिकांत शिंदे हे जावळी तालुक्यातून सोसायटी मतदारसंघातून जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व करतात. तेथून नेहमीप्रमाणे यावेळी देखील त्यांचा ठराव आहेच. दरम्यान, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघातूनही त्यांच्या नावाचा ठराव करून घेतल्याची माहिती संचालक मनोहर बर्गे यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()