कोरोनानंतर विंगसह परिसरात चिकुनगुनिया, डेंगीचे थैमान

विंगमधील १३ घरांत डेंगी डासाच्या अळ्या
Dengue
Dengueesakal
Updated on

विंग (सातारा) : चिकुनगुनिया (Chikungunya Virus) आणि डेंगी (Dengue) साथीच्या पार्श्वभूमीवर कोळेचा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Primary Health Center) पथकाने गावातील २६४ घरांचा सर्व्हे केला. त्यामध्ये १३ घरांतील फ्रिजच्या आऊटलेट ट्रेमध्ये आळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे गावात खळबळ उडाली असून, आता निर्जंतुकीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. चिकुनगुनिया आणि डेंगी आजाराने महिन्यापासून येथे थैमान घातले आहे. त्रास असलेले दोनशेहून अधिक रुग्ण आहेत. रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

Summary

चिकुनगुनिया आणि डेंगी आजाराने महिन्यापासून विंग गावात थैमान घातले आहे.

त्या पार्श्वभूमीवर कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक येथे दाखल झाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया बनकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांची स्वतंत्र सहा आरोग्य पथके तयार केली आहेत. पहिल्या दिवशी २६४ घरांतील एक हजार १२८ लोकांची तपासणी करण्यात आली. त्यातील १३ कंन्टेनर पॅाझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. घरगुती फ्रिजच्या मागील बाजूस आउटलेट ट्रेमध्ये डासाच्या आळ्या सापडल्या. त्या नष्ट करण्यात आल्या. नागरिकांनी फ्रिज स्वच्छ करावा, कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन डॉ. बनकर यांनी केले आहे.

Wing
Wing
Dengue
कोरोनाच्या मुकाबल्‍यासाठी संस्‍थांनी पुढाकार घ्‍यावा; रामराजेंचं आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()