Sharad Pawar : रयतमध्ये जूनपासून ‘ऑक्‍सफर्ड’चा अभ्यासक्रम

रयत शिक्षण संस्थेने ऑक्‍सफर्ड व आयबीएम आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार अद्ययावत शिक्षणाची दारे रयतच्या विद्यार्थ्यांना खुली होणार आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSakal
Updated on
Summary

रयत शिक्षण संस्थेने ऑक्‍सफर्ड व आयबीएम आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार अद्ययावत शिक्षणाची दारे रयतच्या विद्यार्थ्यांना खुली होणार आहेत.

कऱ्हाड - रयत शिक्षण संस्थेने ऑक्‍सफर्ड व आयबीएम आंतरराष्ट्रीय संस्थेशी करार केला आहे. त्यानुसार अद्ययावत शिक्षणाची दारे रयतच्या विद्यार्थ्यांना खुली होणार आहेत. येत्या जूनपासून रयतच्या सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे जिल्ह्यांतील तब्बल दोन हजार विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासह त्याच्या विस्ताराकडे रयतने विशेष लक्ष दिल्याने जागतिक पातळीवरही रयतची मोहर उमटली जाणार आहे, असा विश्वास रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.

येथील एसजीएम महाविद्यालयाच्या शताब्दी इमारतीचे उद्‌घाटन व इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. अनिल पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, अॅड. रवींद्र पवार, डॉ. भगीरथ शिंदे, प्रभाकर देशमुख, राजेंद्र फाळके, सुभाष शिंदे, एम. बी. शेख, संजीव पाटील, राजकुमार पाटील, प्राचार्य डॉ. विठ्ठलराव शिवणकर, डॉ. शिवलिंग मेनकुदळे उपस्थित होते.

Sharad Pawar
Satara : छत्रपतींबद्दल आदर असता तर संभाजीराजेंना का तिकीट दिलं नाही? शिवेंद्रराजेंचा ठाकरेंना सवाल

काही ठराविकांकडे असलेली शिक्षणाची मक्तेदारी कर्मवीर अण्णांमुळे सर्वव्यापी झाली, असे सांगून श्री. पवार म्हणाले, ‘काळाची पावले ओळखून बदल केले पाहिजेत. कर्मवीर अण्णांनी शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजासाठी शिक्षणाची दारे खुली केली. धान्य पैसा रयतेच्या नावाने उभा केला. त्यामुळे महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यास हातभार लागला. शून्यातून निर्माण केलेले रयतचे विश्व सर्वव्यापी होऊ पाहात आहे. बॅरिस्टर पी. जी. पाटील यांना खांद्यावरून आणून अण्णांनी शिक्षण दिले.

बॅरिस्टर होण्यासाठी त्यांना इंग्लंडला रवाना केले. ते परत आल्यानंतर मोठ्या पगाराची नोकरी नाकारत त्यांनी रयत संस्थेत नोकरी केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू एमपीएससी अध्यक्षपदापर्यंत त्यांनी केलेले काम अत्यंत दिशादर्शक आहेत. त्यांच्या पत्नी सुमतीबाई पाटील देखील एमपीएससीच्या अध्यक्षा होत्या. मात्र आज त्याच रयतमध्ये परदेशी मुले शिकायला येतात.

Sharad Pawar
Sharad Pawar : भाजपविरोधी योग्य वेळी मोट बांधणार

प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही म्हणून व्यावसायिक शिक्षणाकडे वळले पाहिजे. जगात ऑक्सफर्ड विद्यापीठ सर्वश्रेष्ठ आहे. तेथे प्रशिक्षणासाठी संस्थेतील निवडक प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी पाठवणार आहोत. आयबीएम कंपनीसोबत रयतने करार केला आहे. तो कोर्स करणाऱ्यांना ८४ टक्के लोकांना नोकरी देण्याचे मान्य केले आहे.’ या वेळी अनिल पाटील, अॅड. रवींद्र पवार, खासदार श्रीनिवास पाटील यांची भाषणे झाली. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. कोमल कुंदप व प्रा. डॉ. प्राजक्ता निकम यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य जे. डी. शिर्के यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()