'हिवरे बाजारमध्ये मला जे काम करता आले, त्याची प्रेरणा यशवंतरावांची आहे.'
कऱ्हाड (सातारा) : महाराष्ट्र राज्य आदर्श गाव समितीचे (Maharashtra State Model Village Committee) कार्यकारी अध्यक्ष व हिवरे बाजारचे (Hiware Bazar) माजी आदर्श सरपंच पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांना दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्कार (Padmashri Award) नुकताच प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्यांनी कऱ्हाडात ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या समाधिस्थळी येऊन पद्मश्री पुरस्कार समाधीवर ठेऊन अभिवादन केले.
ग्रामविकास, जल व्यवस्थापन, वृक्षलागवड आदी क्षेत्रांत केलेल्या कामाची दखल घेऊन पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्यांनी कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी येऊन हा पुरस्कार समाधीवर ठेऊन अभिवादन केले. यावेळी बाबासाहेब पवार, शिवाजी गोहोड, नवनाथ खाणगे, दत्ता पादीर उपस्थित होते.
त्यानंतर बोलताना श्री. पवार म्हणाले, ‘‘ज्यांनी या देशात पंचायत राज व्यवस्था निर्माण करून पाया मजबूत करण्याचा मोठा प्रयत्न केला. त्या यशवंतराव चव्हाणांच्या प्रीतिसंगमावरील समाधिस्थळी येऊन अभिवादन करून साहेबांचे चरणस्पर्श केले. त्याचे मला आत्मिक समाधान लाभले. हिवरे बाजारसारख्या एका छोट्याशा गावात सरपंच महणून काम करताना स्वावलंबी गाव करण्यात खुप मोठी प्रेरणा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची होती. हिवरे बाजारमध्ये मला जे काम करता आले, त्याची प्रेरणा यशवंतरावांची आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.