'गोल्ड ट्रेडिंग'मधून 74 लाखांची फसवणूक

Gold Trading
Gold Tradingesakal
Updated on

भुईंज (सातारा) : परदेशातून येणाऱ्या स्वस्तातील सोन्यात (Gold) पैस गुंतवून त्या मोबद्दल्यात अनेक पटीने फायदा देण्याच्या बहाण्याने भुईंजमधील व्यापारी (Trader) व ग्रामस्थांना ७४ लाखांना फसविणाऱ्या दोघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. राहुल ऊर्फ पप्पू बजरंग मोरे (रा. विजयनगर, भुईंज) असे चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. पल्लवी अत्माराम घाडगे (Pallavi Ghadge) (रा. फ्लॅट नं २०६, तिसरा मजला, बी विंग, चिंतामणी विहार, जानवली, ता. कणकवली) ही फरारी आहे. (Pallavi Ghadge Cheated Citizens From Gold Trading Satara Crime News)

Summary

गुंतवणुकीचा आकडा वाढल्यानंतर संबंधितांनी पैसे देण्याचे बंद केल्याने गुंतवणूकदारांनी मोरेस विचारणा केली. त्या वेळी त्यानेही उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.

याबाबत माहिती अशी, भुईंज येथील राहुल ऊर्फ पप्पू मोरे याने ‘माझी भाची पल्लवी हिचा गोल्ड ट्रेडिंगचा (Gold Trading) व्यवसाय आहे. त्यात पैसे गुंतवले, की तुम्हाला परतावा मिळेल. एक तोळ्याचा दर असेल तो गुंतवला तर ४० दिवसांत प्रत्येक तोळ्यामागे पाच हजार रुपये मिळतील. दहा तोळ्यांवर गुंतवणूक केल्यास महिन्याला ५० हजार रुपये मिळणार,’ अशा प्रकारे आमिष दाखवून सात ते आठ जणांकडून लाखो रुपये जमा केले. अनेकांनी त्यांच्या बँक खात्यावर (Bank Account) एनईएफटी व आरटीजीएसद्वारे पैसे पाठविले. प्रथमदर्शनी काही लोकांना गुंतवलेल्या प्रमाणात पैशाचा परतावाही केला.

Gold Trading
सेल्फीच्या नादात तरुण 600 फूट दरीत कोसळला

मात्र, गुंतवणुकीचा आकडा वाढल्यानंतर संबंधितांनी पैसे देण्याचे बंद केल्याने गुंतवणूकदारांनी मोरेस विचारणा केली. त्या वेळी त्यानेही उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. गेल्या सहा महिन्यांपासून या गुंतवणूकदारांनी अनेक वेळा पल्लवी व राहुल यांना पैसे मागितले. मात्र, त्यांनी पैसेही दिले नाहीत. त्यांनतर पल्लवी ही फरारी झाली, तर राहुलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. राहुल व पल्लवी हे या प्रकरणातील म्होरके असले तर पडद्यामागील सूत्रधार वेगळे असून, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा फसवणूक झालेल्यांकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिवाजी तोडरमल तपास करीत आहेत.

Gold Trading
बंडातात्‍यांची सुटका करा, अन्यथा तीव्र आंदोलन

फसवणुकीचा आकडा कोटींच्या घरात?

या प्रकरणी अमर सदाशिव कडव यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. या प्रकणात विनोद बाबासाहेब पावशे, कुणाल प्रकाश तांबोळी, अमोल कडव, रमेश चिकणे, नंदकुमार तांबोळी याच्यांसह सात लोकांनी या स्किममध्ये पैसे गुंतवले होते. त्यानुसार त्यांची ७४ लाखांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक गुंतवणूकदार बाहेरगावी असल्याने त्यांची संख्या वाढून या फसवणुकीचा आकडा कोटीच्या घरात असल्याची चर्चाही तक्रारदार व साक्षीदारांकडून सुरू आहे.

Pallavi Ghadge Cheated Citizens From Gold Trading Satara Crime News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.