तारळे/ढेबेवाडी : विकासकामांकडे बघून मतदान करणारी पाटण तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. कामे करणाऱ्यांबद्दलच लोक बोलतात, बिन कामांबद्दल ते कसे बोलतील. गावे, वाड्यावस्त्या रस्त्याने जोडल्या आहेत.
अडीच वर्षांत दोन हजार कोटींवर विकासकामे केली आहेत. त्यामुळे पाटण मतदारसंघातील जनता मला पुन्हा चौथ्यांदा काम करण्याची संधी देईल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
श्री. देसाई यांच्या प्रचारार्थ तारळे, ढेबेवाडी, मल्हारपेठ येथे सांगता सभा झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपचे नेते भरत पाटील, माजी शिक्षण सभापती संजय देसाई, लोकनेते बाळासाहेब कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, आदित्यराज देसाई, जयराज देसाई, पंजाबराव देसाई, डॉ. दिलीपराव चव्हाण, कविता कचरे, सरपंच भाग्यश्री पाटील, तारळेतील बबनराव शिंदे, रामभाऊ लाहोटी, एस. के. वागडोळे, विजय पवार, गोपाल जाधव, अभिजित पाटील, नामदेवराव साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
श्री. देसाई म्हणाले, ‘‘पाटणकरांना बांधकाममंत्री असताना रस्त्याचे जाळे विणणे जमले नाही. ते मी त्या खात्याचा मंत्री नसतानाही करून दाखवले. गावे व वाड्यावस्त्या रस्त्याने जोडल्या असून, काही गावांत अंतर्गत रस्त्यांची कामे झालेली नाहीत.
ती आगामी अडीच वर्षांतच पूर्णत्वाला नेणार आहे. मराठवाडी धरणग्रस्तांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्यात मला यश आले. काही प्रलंबित प्रश्नांचा आगामी काळात तातडीने निपटारा करू. धरण परिसरात पर्यटन विकासावर आमचा भर असेल.’’
ते म्हणाले, ‘‘तारळे जिल्हा परिषद गटाला कायम विकासात झुकते माप दिलेय. तुम्हाला पाहिजे त्यावेळी पाहिजे ती कामे दिली. त्या पद्धतीने आता तुम्ही भरघोस मते पदरात घालाल, अशी अपेक्षा करतो. आगामी काळात याहीपेक्षा जोरात विकास होईल.’
नरेंद्र पाटील यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पावलावर पाऊल ठेवून शंभूराज देसाई यांची वाटचाल सुरू आहे. त्यांच्या कामाची पद्धती आम्ही जवळून पहिली आहे. पाटण तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास त्यांनी केला आहे, असे सांगितले.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.