Shambhuraj Desai : नाम तो सुना ही होगा, शंभूराज! पाटणकरांच्या एकहाती सत्तेला पालकमंत्र्यांकडून 'सुरुंग'

45 वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची सत्ता आहे.
Patan Election Shambhuraj Desai
Patan Election Shambhuraj Desaiesakal
Updated on
Summary

शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलनं 18 पैकी 15 जागा जिकंत पाटणकरांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावला.

मोरगिरी (सातारा) : पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या नेतृत्वाखालील लढलेल्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलनं 18 पैकी 15 जागा जिंकत पाटणकरांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावला.

पाटण तालुक्याचे युवा नेते यशराज देसाई (Yashraj Desai) यांनी आखलेल्या रणनितीपुढं विरोधकांनी 45 वर्ष पाळमुळे रोवलेल्या बाजार समिती निवडणुकीत सत्तांतर झाल्यानं पाटणकरांना धक्का मानला जात आहे.

निवडणुकीत यशराज देसाईंनी दिलं स्वत:ला झोकून

लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई यांनी या निवडणुकीत स्वत:ला झोकून देत विभागवार मेळावे आणि सभांचं आयोजन केलं होतं. सुरूवातीपासून निकाल लागेपर्यंत प्रत्येक मतदार यांचा आढावा, तसेच आपली भूमिका मतदारापर्यंत पोहचवताना त्यांनी निवडणूक रणनिती आखली होती.

Patan Election Shambhuraj Desai
Karnataka Election : कर्नाटकात 'ही' लढत ठरणार हायहोल्टेज, माजी मुख्यमंत्र्यांसमोर शिष्याचं कडवं आव्हान

पालकमंत्री देसाईंनी 45 वर्षानंतर मारली बाजी

परंतु, 45 वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची सत्ता आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचे तगडे आव्हान देसाई गटापुढं होतं. त्यामुळं पाटणकरांच्या ताब्यातील बाजार समिती घेण्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांना यश मिळणार का याबाबत तालुक्यातील जनतेत उस्तुकता होती. नुकत्याच लागलेल्या बाजार समिती निवडणूक निकालानं पालकमंत्री देसाई यांनी 45 वर्षानंतर बाजी मारली आहे.

Patan Election Shambhuraj Desai
Ajit Pawar : ..म्हणून अजितदादा सगळ्यांनाच आवडतात; कार्यकर्त्यासाठी त्यांनी असं काही केलं की..

पाटणकरांना मोठा धक्का

पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 15/3 असं सत्तांतर झालं असून या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेनं 15 जागेवरती निर्विवाद विजय मिळवला आहे. पाटणकर गट 3 जागांवर विजयी झालं आहे. शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलनं 18 पैकी 15 जागा जिकंत पाटणकरांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावला. पाटण तालुक्याचे युवा नेते यशराज देसाई यांनी आखलेली रणनितीपुढं विरोधकांनी 45 वर्ष पाळमुळे रोवलेल्या बाजार समिती निवडणुकीत सत्तांतर झाल्यानं पाटणकरांना धक्का मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.