सातारा : पाटण तालुक्यात (Heavy Rain in Patan Taluka) भूस्खलनामुळे दबल्या गेलेल्यांपैकी मिरगावातील सहा, ढोकावळेतील तीन व आंबेघरमधील (Landslide In Aambeghar) अकरा असे 20 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला (NDRF Team) यश आले आहे, तर शनिवारी रात्री उशिरापर्यंत इतरांचा शोध घेतला जात होता. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या या तिन्ही गावातील नातेवाईकांचा अश्रूंचा महापूर आला असून ग्रामस्थांच्या वेदना पाहून मदतकर्त्यांच्या डोळ्याच्या कडाही ओलावत आहेत. (Patan Landslide 20 People Death In landslide At Mirgaon Dhokavale Ambeghar bam92)
पाटण तालुक्यात भूस्खलनामुळे दबल्या गेलेल्यांपैकी मिरगावातील सहा, ढोकावळेतील तीन व आंबेघरमधील अकरा असे 20 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला (NDRF Team) यश आले आहे.
दरम्यान, मिरगाव व ढोकावळे हे गावे एवढी दुर्गम आहेत, की याठिकाणी मदतीसाठी यंत्रणा पोहोचवितानाही प्रशासनाला कसरत करावी लागली आहे. गुरूवारी रात्री या गावांवर दरडी कोसळल्या. मात्र, घटनास्थळी जेसीबी, पोकलॅन पोहोचायला शनिवारची सायंकाळ झाली. दोन दिवस या गावांना जाण्यासाठी रस्ता तयार करण्यातच प्रशासनाला वेळ घालवावा लागला. पाटण तालुक्यातील मिरगाव आणि ढोकावळे येथे दरड कोसळून अनेक घरे त्याखाली गाडली गेली. दरडीखाली सुमारे (Aambeghar Landslide) अकराजण दबले गेले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारी पावसाचा जोर कमी झाल्यामुळे मदतकार्याला वेग आला. मात्र, दगड, माती हटविण्यासाठी जेसीबी आणि पोकलॅनसारखी यंत्रणा गावापर्यंत पोहोचू न शकल्यामुळे मदतकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. दिवसभर रस्ता करून या यंत्रणा सायंकाळी घटनास्थळी पोहोचल्या असून इतर बेपत्ता असणाऱ्या नागरिकांचा आता शोध घेतला जात आहे.
ढोकावळे येथील हरिबा रामचंद्र कांबळे, पूर्वा गौतम कांबळे, राहीबाई धोंडिबा कांबळे या तीन जणांचे मृतदेह सापडले असून जागेवरच दहन देण्यात आले, तर सुरेश भांबू कांबळे यांना ग्रामस्थांनी ढिगा-यातून जखमी अवस्थेत बाहेर काढले. मात्र, गावातून बाहेर पडता न आल्यामुळे उपचाराअभावी ग्रामस्थांसमोरच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिरगाव येथील मुक्ता मनोज बाकाडे (१०), वसंत धोंडिबा बाकाडे (५५), कमल वसंत बाकाडे (५०), देवजी बापू बाकाडे (वय ७५), शेवंताबाई देवजी बाकाडे (७०), यशोदा केशव बाकाडे (७०), युवराज जयवंत बाकाडे (५) यांच्यासह एकाच कुटुंबातील आनंदा रामचंद्र बाकाडे (४९), मंगल आनंदा बाकाडे (४५), भूषण आनंदा बाकाडे (१८), शीतल आनंदा बाकाडे (१५) हे अकराजण दरडीखाली गाडले गेले होते. त्यापैकी शुक्रवारी एक शनिवारी रात्रीपर्यंत सहाजणांचे मृतदेह हाती लागले असून इतरांचा शोध घेतला जात आहे.
आता खरी गरज आहे अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची!
ढोकावळे येथील १२५ ग्रामस्थांना चाफेर येथील हायस्कूलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. तर मिरगाव येथील २६० ग्रामस्थांना प्राथमिक शाळेत हलविण्यात आले आहे. तसेच बाजे येथील गावाच्या बाजूने डोंगराचे कडे तुटल्याने तेथील ग्रामस्थांना लाँचने कोयनेतील हायस्कूलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. गोकुळनाला येथील सहा कुटुंब स्थलांतरीत केली आहेत. त्यांना कोयना भागातील ग्रामस्थांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे. स्थलांतरित कुटुंबांना तात्पुरता निवारा मिळाला आहे. आता खरी गरज आहे कपडे, पांघरुण व पुढील काही दिवसांसाठी अन्नधान्याची. यात अनेक लहान मुल, वयोवृद्ध आहेत. दरम्यान, मिरगाव येथील स्थलांतरित सर्व ग्रामस्थांनी गोठ्यातील जनावरे रिकामी सोडून दिली आहेत. बाजे येथील ग्रामस्थांना रात्री स्थलांतरित करण्यात आले. मात्र, त्यांची जनावरे गोठ्याच बांधून ठेवण्यात आली असल्यामुळे जनावरे सोडण्यासाठी परत जाण्याकरिता सायंकाळी ते लाँचची वाट पाहत धरणाचा काठावर बसून होते.
Patan Landslide 20 People Death In landslide At Mirgaon Dhokavale Ambeghar bam92
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.